Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

■भोगवटाधारकांच्या नावे घरे करा-कॉ. एड.अजय बुरांडे


●विविध मागण्यांसाठी माकप व किसान सभेचे परळी तहसीलवर तीव्र निदर्शने

परळी / प्रतिनिधी

गायरान जमीनी कसणारांच्या नांवे करणे,भूमिहीन भोगवटाधारकांच्या नावे घरे करा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागणी बाबत सोमवार दि 5 रोजी माकप आणि किसान सभेच्यावतीने परळी तहसील कार्यालयात जोरदार निदर्शने करण्यात आली.हे निदर्शने माकपचे जिल्हा सचिव कॉ.एड.अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकरी,महिला यांची उपस्थितीत करण्यात आली.



परळी तालुक्यातील गायरान जमीनी कसणारांच्या नांवे करणे,भूमिहीन शेतकरी शेतमजुरांनी गेली अनेक वर्षांपासून शासकीय गायरान जमीनीवरील बाधलेली घरे भोगवटादारांच्या नावे लवकरात लवकर करुन देण्यात यावीत व या कसणारांच्या नांवे करावी, अतिवृष्टी मदतीपासुन अद्याप वंचित शेतकऱ्यांना किमान खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी रखडलेले अतिवृष्टी अनुदान वाटप करावे.कापूस व सोयबीनचे जाणिवपुर्वक पाडलेले बाजार भाव पूर्वतत करण्यासाठी शासनाने ठोस पावल उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासानिक खते व बियाणे यांच्या किंमती नियंत्रित करून त्याच काळाबाजार व बनावट विषाणे रोखून रास्त किमतीत त्यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा वेळेवर करुन देण्यात यावा.अक्षय भालेकरच्या मारेकऱ्यांना तात्काळ कठोर शिक्षा द्यावी, अंदोलक कुस्ती पटूबर झालेल्या लैंगिक अत्याचार करणाऱ्या बीजभूषण सिंगला अटक करावी  या मागण्या घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बीड जिल्हा किसान सभेच्या वतीने सोमवार दि 5 रोजी परळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात सिरसाळा आणि परिसरातील शेकडो भोगवटाधारक शेतकरी,कुटूंबिय आपल्या बायका-पोरासह सहभागी झाले होते.


या आंदोलनाचे नेतृत्व माकपचे जिल्हा सचिव कॉ.एड. अजय बुरांडे, कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ भगवान बडे, कॉ सुदाम शिंदे, पप्पू देशमुख, मदन वाघमारे, कॉ परमेश्वर गीत्ते यांच्या सह शेकडो सिरसाळा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माकपचे ज्येष्ठ नेते कॉ पी एस घाडगे यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या