Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -संपादक दिलीपभाऊ खिस्ती

 



बीड सहोदया चा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

आपला ई पेपर गेवराई प्रतिनिधी

आर के पब्लिक स्कूलमध्ये आज शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्सचा पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रत्नसागर प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील २३ उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रत्नसागर प्रायव्हेट लिमिटेड चे उप विभागीय व्यवस्थापक सुनील लब्बा आणि मार्केटिंग प्रमुख राहुल उमरेडकर , अशोक गटकळ, दैनिक लोकप्रश्न चे गेवराई तालुका प्रतिनिधी अयुब बागवान उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दैनिक लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती यांनी या प्रसंगी बोलताना म्हटले, "शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार  आहेत त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आपल्या देशाला उज्जवल भविष्य लाभते. आजच्या या पुरस्कार सोहळ्याने अशा कर्तबगार शिक्षकांचा गौरव केला आहे, हे अत्यंत स्तुत्य आहे."अध्यक्षस्थानी असलेले आर के पब्लिक स्कूलचे संचालक आर.के.चाळक यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकांचे योगदान अमूल्य असते. आजच्या या कार्यक्रमाद्वारे सीबीएसई मान्यताप्राप्त संघटना बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स ने त्यांच्या कार्याला मान्यता देण्याचा प्रयत्न केला आहे आणि या सोहळ्याचे यजमानपद आम्हाला मिळणे हे आमचे सौभाग्य आहे."कार्यक्रमात विविध शाळांमधील २३ शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये अंबाजोगाई, परळी वैजनाथ, केज, माजलगाव, बीड शहर, गेवराई, गढी, कडा, आष्टी, सोनपेठ आणि भोकरदन या ठिकाणांच्या शाळांमधील शिक्षकांचा समावेश होता.बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष तथा सिंदफणा पब्लिक स्कूलचे प्राचार्य अन्वर शेख यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषण, "हा पुरस्कार सोहळा यापुढे दरवर्षी आयोजित केला जाईल तसेच येणाऱ्या काळात पालकांसाठी सुद्धा काही कार्यक्रम सहोदया आयोजित करेल विश्वास व्यक्त केला ."

सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्सचे कौतुक केले. या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण झाली असून, यापुढेही अशा उपक्रमांचे स्वागत असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर के पब्लिक स्कूलचे शिक्षक दिगल उग्रसेन यांनी केले. पाहुण्यांचा परिचय गुरुकुल पब्लिक स्कूल चे प्राचार्य तथा बीड सहोदया चे सचिव शितल सर्वज्ञ आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आंबेजोगाई चे प्राचार्य तथा बीड सहोदयाचे उपाध्यक्ष कीर्ती कुमार देशमुख यांनी दिला तर आभार सुप्रिया तनपुरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीड सहोदयाचे सर्व सदस्य प्राचार्य आर. के. पब्लिक स्कूलचे प्राचार्य गणेश चालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या