Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राजस्थानी मल्टीस्टेटच्या लातूर शाखेचा सोमवारी वर्धापन दिन


परळी/प्रतिनिधी

राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.परळीच्या लातूर शाखेचा प्रथम वर्धापन दिन सोमवार दि.12 जुन रोजी साजरा करण्यात येत असून यानिमित्त श्री सत्यनारायण पुजा व पानसुपारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती राजस्थानी मल्टीस्टेटच्या वतीने देण्यात आली.

राजस्थानी मल्टीस्टेटच्या लातूर विस्तारीत सेवा कक्ष येथील शाखेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

12 जुन रोजी सकाळी 10 ते सायं.6  या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण पुजा, तीर्थप्रसाद व अल्पोपहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवनेरी गेटजवळ, कव्हा रोड, मार्केट यार्ड लातूर येथे सदरचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास नागरिक तसेच राजस्थानी मल्टीस्टेटच्या सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी.डी.अग्रवाल, कोषाध्यक्ष विजयप्रकाश लड्डा, तसेच संचालक अशोक जाजू, सतिश सारडा, सौ.प्रेमलता बाहेती, सौ.कल्पना बियाणी, नामदेवराव रोडे, अजय पुजारी, कार्यकारी संचालक जगदीश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.बी.कुलकर्णी, तसेच स्थानिक सल्लागार सत्यनारायण लड्डा, बालकिशन मुंदडा, गंगाधर धुत, कमलाकर कुलकर्णी, गोविंद कोठारी, सत्यनारायण हेड्डा, गोकुळदास चांडक, बालाप्रसाद बिदादा, गोविंदलाल पारीख, पांडुरंग कचोळिया, ओमप्रकाश मुंदडा, दिनेश गिल्डा, तसेच लातूर विभागीय व्यवस्थापक प्रमोद लाहोटी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या