Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI BEED |धक्कादायक चक्क एका पावसाने वाहून गेला निकृष्ट दर्जाचा पर्यायी पूल...

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


PARLI BEED परळी तालुक्यातील पांगरी येथील वाण नदीवरील तात्पुरत्या स्वरूपाचा तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्याने परळी-बीड महामार्ग बंद झाल्याने वाहतूक खोळंबली आहे.

परळीकरांच्या नशिबी सतत संघर्षाचा डोंगर कायम असतो. नुकतेच या ठिकाणचा पूल वाहून गेल्यामुळे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे अनेक वाहनांची तारांबळ उडाली.

बीड राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. काम सुरू करत असताना अगोदर पुलांची कामे करणे आवश्यक असताना किंवा पावसाळ्या अगोदर काम पूर्ण करणे गरजेचे असताना गुत्तेदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या पुलांचे काम सुरू केले आहे.

परळी -बीड मार्गावर नागापूर येथून येणारी मोठी वाण नदी वाहते या नदीला दरवर्षी नागापूरचे वाण धरण भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पूर येतो. वाण नदी, वाफ नदी, पापनाशी नदी याही नद्यावरील पुलाचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आले आहे. 

या कामाला वेळपण लागणार आहे. काम सुरू करत असताना यश कन्स्ट्रक्शन पुल पाडल्यानंतर या नद्यांवर जे तात्पुरते पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे याठिकाणी मोठ मोठ्या नाल्या टाकणे अपेक्षित होते. कारण या नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात पण गुत्तेदाराने सुरुवातीला फक्त भराव टाकला होता. जसे काही या नद्यांना पाणी येणार नाही, दुष्काळ पडणार असल्याचा विश्वास गुत्तेदाराला होता. पण त्याच्या अपेक्षे प्रमाणे यंदा चांगले पाऊस पाणी झाल्याने नदीला पाणी आले. 

यानंतर वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर लहान लहान नाल्या टाकण्यात आल्या. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात हा तात्पुरत्या पुलाचा भराव, नाल्या वाहून गेल्या. यामुळे PARLI BEED मार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. पांगरीसह या मार्गावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

नाथऱ्यातील तात्पुरता पुलही गेला वाहून परळीचा संपर्क तुटला

नाथरा येथील वाण नदीच्या पात्रावरील नाथरा - इंजेगाव मार्गावरील पुलाचे काम सध्या सुरू असून याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा पुल तयार करण्यात आला होता. पण शुक्रवारी वाण नदीला आलेल्या पुरात हाही पुल व भराव वाहून गेला आहे. यामुळे नाथऱ्याचा परळी व इतर गावाचा संपर्क तुटला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या