Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीतील पोलीस स्टेशन मध्ये आरोपीचा फिट येऊन मृत्यू ? | पोलिसात गुन्हा नोंद

आपला ई पेपर 

परळी शहरातील  पोलीस स्टेशन मध्ये संशयित आरोपी म्हणून आणलेल्या व्यक्तीचा फिट येऊन मृत्यू झाल्याची घटना चर्चात आहे.परळी पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री च्या सुमारास ही घटना घडली.



परळी पोलिसांकडून दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते यातील एक व्यक्ती मयत झाला असून मयत व्यक्तीच्या मुलाने आरोप केला आहे की,”माझ्या वडिलांना व मला परळी पोलिसांनी चौकशीसाठी परळी पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले व चौकशी दरम्यान मला व माझ्या वडिलाला..  करीत विचारपूस करीत होते. 


यामध्ये माझ्या वडिलांचे पोलीस स्टेशन मध्येच पोलीस डेट झाली आहे” असे आरोप मयत यांचे नातेवाईक करीत आहेत.



 या व्यक्तीला पोलिसांनी परळी उपजिल्हा रुग्णालय मध्ये आणले. त्यानंतर  डॉक्टरांनी या व्यक्तीला मयत घोषित केले.खान झरीन (वय 48 वर्ष राहणार मलिक पुरा परळी ) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.


मयत हा मुस्लिम समाजाचा आहे.  या ठिकाणी शेकडोच्या संख्येने लोक  जमा झाले होते. घटनाची माहिती मिळतात जिल्ह्याचे पोलीस सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत्.


दरम्यान या घटनेमुळे पोलीस ठाण्यासमोर काही काळ तणाव 

परळी उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. तात्काळ वरिष्ठ अधिकारी कविता नेरकर या दाखल होऊन जमलेल्या गर्दीला व तणावपूर्ण वातावरणाला शांतता राखण्याचा आवाहन केले पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाल्याने तणावपूर्ण शांतता आहे.

सदरील माहिती व्यक्तीवर परळी पोलिसात अनेक गुन्ह्याची नोंद असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या आरोपीला  संशयित म्हणून अटक करण्यात आले होते अशी माहिती मिळत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या