Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा परळी रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

 



आपला ई पेपर परळी 

पुणे येथील सीआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस दलात असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकची परळी रेल्वे स्टेशन दरम्यान साधारण पाचशे ते 400 मीटर अंतरावर  च्या दरम्यान मृतदेह आढळला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत ही धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. सदर मयताच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याचे पहायला मिळाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बीड येथून पुणेयेथे बदली झाललेले पोसनि बदली दरम्यान, मृत दुधाळ पोलिस खात्यातील सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बीड येथून पुणे येथे सीआयडी पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून कौटुंबिक कारणाने त्यांनी जीवन संवल्याची माहिती मिळते आहे.

🟣बीडमध्ये पोलीस निरीक्षकाने रेल्वेखाली उडी घेत संपवले जीवन

आपला ई पेपर परळी 

परळी -बीड- पुणे येथे सीआयडी विभागात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाने बीडमधील परळी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष भीमराव दुधाळ (४१) असं आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच दुधाळ यांची बीड येथून पुणे येथील सीआयडी विभागात बदली झाली होती.

परळी रेल्वे स्टेशन मास्तर यांनी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये रेल्वेगाडीखाली एका व्यक्तीचे दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना दिली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून सुभाष दुधाळ यांची ओळख होती. बुलडाणा जिल्ह्यात रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. रायपूर वरून बदली झाल्यावर त्यांच्यावर बुलडाणा सायबर क्राईम विभागाची देखील जबाबदारी होती. त्यावेळी त्यांच्या टीमने अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली होती. वर्षभरापूर्वी सुभाष दुधाळ यांची बीड येथे बदली झाली होती. नुकतीच बीड मधून त्यांची पुण्यातील सीआयडी विभागात बदली झाली होती. आता त्यांनी बीडमधील परळी रेल्वेस्टेशनजवळ रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातून ते परळीत कशासाठी आले होते हे कळू शकले नाही. सुभाष दुधाळ यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे झालेले आहेत. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकलेले नाही. 

🔴🔴🔴🔴🔴🔴

परळीकर मंत्रमुग्ध.. जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर देवस्थानाच्या भव्यदिव्य पालखी व दिंडी सोहळ्याने..*

👇💫💥👇💫💥

*https://youtu.be/PByS0WtnLFg?feature=shared*

*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*


*Breaking.! परळी वैद्यनाथच्या गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडीचे प्रगती सिटी केबलव्दारा live दर्शन थेट प्रेक्षपण....*

परळीत केबल नेटवर्क मध्ये एक पाऊल पुढे असलेल्या प्रगती सिटी केबलच्या माध्यमातून भक्तांना थेट घरात बसून दर्शनांची मनोभावी इच्छा पुर्ण झाली..

👇👇💫💥| https://aplaepaper.blogspot.com/2020/02/breaking-live.html*

संपर्क- प्रगती सिटी केबल नेटवर्किंगचे मुख्य व्यवस्थापक
*वैजनाथ झरकर*(मालक),

*अजय धोकटे*
9860885642

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या