Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमूळे खिलाडू वृत्ती वृध्दींगत होते प्राचार्या रश्मी अरोरा

 

आपला ई पेपर गेवराई प्रतिनिधी


आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमूळे खिलाडू वृत्ती वृध्दींगत होते असे मत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रश्मी अरोरा यांनी व्यक्त केले त्या बीड सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्स आयोजित सीबीएसई आंतरशालेय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. 


 बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर, गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूल मध्ये शनिवारी एक दिवसीय सीबीएसई आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्सच्या वतीने आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील 22 शाळांमधील एकूण 88 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धा 14 आणि 17 वर्षे वयोगटांसाठी मुले आणि मुलींच्या वेगवेगळ्या गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यामध्ये श्रीमती रश्मी अरोरा (प्राचार्या, ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल, बीड) यांच्या हस्ते झाले त्यांनी बीड सहोदया संघटनेची कार्यप्रणाली तसेच गेल्या एक वर्षांमध्ये संघटनेने आयोजित केलेले विविध उपक्रम याबद्दल सखोल माहिती उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांना दिली. यावेळी श्री. शितल सर्वज्ञ (सचिव, बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स तथा प्राचार्य, गुरुकुल इंग्लिश स्कूल, बीड), श्री. गणेश चाळक (प्राचार्य, आर के पब्लिक स्कूल, गेवराई) आणि कॅप्टन दास पिल्लई (प्राचार्य, शिव शारदा पब्लिक स्कूल) उपस्थित होते. 14 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये कु. रिया सुपेकर (अनिषा ग्लोबल स्कूल, आष्टी) प्रथम, कु. सानवी आवचर (भेल सेकंडरी स्कूल, परळी वैजनाथ) द्वितीय आणि कु. तेजल भुतडा (शिव शारदा पब्लिक स्कूल, गेवराई) तृतीय क्रमांकावर आल्या. तर मुलांमध्ये कु. प्रतीक राठोड (इगलवुड इंग्लिश स्कूल, फुले पिंपळगाव) प्रथम, कु. शिवम गुट्टे (भेल सेकंडरी स्कूल, परळी वैजनाथ) द्वितीय आणि कु. स्मित इंदनी (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, बीड) तृतीय क्रमांकावर आले. 17 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये कु. वेदश्री चौधरी (भेल सेकंडरी स्कूल, परळी वैजनाथ) प्रथम, कु. सत्काशी अपेट (न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, आंबेजोगाई) द्वितीय आणि कु. सिद्धी पवार (आर के पब्लिक स्कूल, गेवराई) तृतीय क्रमांकावर आल्या. मुलांमध्ये कु. दक्ष सोनवणे (आर के पब्लिक स्कूल, गेवराई) प्रथम, कु. अवधूत महादर (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, बीड) द्वितीय आणि दिग्विजय महाजन (भेल सेकंडरी स्कूल, परळी वैजनाथ) तृतीय क्रमांकावर आले.

विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यासाठी श्री. रणवीर पंडित (अध्यक्ष, शारदा स्पोर्ट्स अकादमी), श्री. अन्वर शेख (अध्यक्ष, बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स तथा प्राचार्य, सिंदफणा पब्लिक स्कूल) आणि कॅप्टन दास पिल्लई ( प्राचार्य, शिव शारदा पब्लिक स्कूल) उपस्थित होते. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून श्री. शेंडगे रामप्रसाद, श्री. क्षीरसागर आणि श्री. धापसे दिपक यांनी काम पाहिले.बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्सचे मुख्य उद्दिष्ट - जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे - या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिव शारदा पब्लिक स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील तरुण बुद्धिबळपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली, तसेच विविध शाळांमधील क्रीडाशिक्षक व विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधण्याचीही संधी मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या