Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बंद दाराआड कुठली | राजकीय चर्चा झाली ...एकनाथ खडसे - पंकजाताईंचे स्पष्टीकरण काय

 

परळी / प्रतिनिधी 

दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर असलेल्या समाधीची स्थळी आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजचे किर्तन आणि पुण्यस्मरण कार्यक्रम केवळ स्व. मुंडे साहेबां यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि परिवाराचा असो आहे. त्यामुळे यात कुठलाही राजकीय विषय व राजकीय व्यक्ती हा विषय नाही तर स्व. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांचा आज दिवस हा कार्यक्रम आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. मात्र ही चर्चा केवळ आणि केवळ कौटुंबिक होती असे एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चावर स्पष्ट केले. 

पंकजाताई भाजपमध्ये अस्वस्थ नाहीत मी त्यांच्याशी चर्चा करताना असे काही वाटले नाही. त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला गेला असे यावेळी खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. स्व. गोपीनाथजी मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे. आमच्या भेटीमध्ये अर्धा पाऊण तास कौटुंबिक चर्चा केली. दोघांनीही मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला यापलीकडे राजकारणाचा कोणताही विषय झालेला नाही असेही खडसे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या