Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लोकनेते मुंडे साहेब जातांना पंकजाताईंसारखी झाशीची राणी देऊन गेले ; त्यांना जपा

 

रामायणाचार्य ढोक महाराजांच्या कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध

परळी वैजनाथ,। प्रतिनिधी 

लोकनेते मुंडे साहेब जातांना आपल्याला पंकजाताईंसारखी झाशीची राणी देऊन गेले आहेत,  त्यांना सांभाळणं आपल्या सर्वांचं काम आहे याची जाणीव रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांनी आज आपल्या कीर्तनातून करून दिली.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन हे संतांनी वर्णिल्या प्रमाणे कृपावंताचे होते असंही ते म्हणाले.

   लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमीत्त गोपीनाथ गडावर रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांची किर्तनसेवा झाली.प्रारंभी भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी महाराजांचा सत्कार केला.या किर्तन सेवेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत  रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी विविध दृष्टांत व उदाहरणे देत विवेचन केले.उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत ॥१॥केवढा केला उपकार ।काय वाणू मी पामर ॥२॥जड जीवा उद्धार केला।मार्ग दाखविला सुपंथ ॥३॥सेना म्हणे उतराई।होता कांहीं दिसेना ॥४॥ " या संत सेना महाराज यांच्या अभंगावर विवेचन केले.

       याप्रसंगी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी पुढे विवेचन करतांना सांगितले की, ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई यांच्या कालखंडातील, महाराष्ट्राबाहेर जन्मलेले पण कर्मभूमी महाराष्ट्र असलेले संत सेना महाराज यांनी वर्णन केले आहे की, देवाचे उपकार मानण्यापेक्षा संताचे उपकार किती थोर आहेत याची जाणीव झाल्यानंतर  त्यांना उद्देशून अभंगाची सुरुवात करतात " उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत.संत हे फळांनी लगडलेल्या वृक्षा सारखे असतात. नेहमी सावली देतात, खायला गोड फळे देतात कोणी त्याच्यावर कुऱ्हाड चालवली तरीही सहनशील असतात. आईवडीलांसारखे दयाळु, जीवापाड प्रेम करून सांभाळ करतात. हे जग दाखवतात.जन्माला येणारा जीव हा जड असतो, अज्ञानी असतो. अफाट ह्या जगात वाईट गोष्टींची कमी नाही. संत सगळ्यांनाच चांगला मार्ग दाखवतात. त्यांचा उद्धार करतात. सन्मार्ग दाखवतात. हेच जीवन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे आहे.अशा लोकोत्तर कृपावंताने दाखवलेल्या मार्गावर आपण वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी केले. कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील गुणीजण,टाळकरी,भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

साहेब पंकजाताईंच्या रुपाने  झाशीची राणी आपल्याला देउन गेले, त्यांना सांभाळा

---------

दरम्यान, या किर्तन प्रसंगी लोकनेते मुंडे साहेब यांच्या अनेक आठवणींना रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी उजाळा दिला.काही प्रसंग सांगतांना महाराज भावूक झाले होते.लोकनेते मुंडे साहेब हे लोकोत्तर कृपावंत आपल्याला पंकजाताईसारखी झाशीची राणी  देउन गेले आहेत, त्यांना सांभाळा असे प्रतिपादन त्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या