Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भीषण रेल्वे अपघातात 233 ठार ,900 जखमी | एक्सप्रेस - मालगाडीची अपघात...

आपला पेपर

 एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की एक्स्प्रेस रुळावरून घसरली. 233जणांचा मृत्यू तर 900 जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी हा रेल्वे अपघात झाला. येथील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल येथे रेल्वेच्या डब्यात अनेक जण अडकल्याची बाब समोर येत आहे.

सध्या या मार्गावरील गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. या अपघातात 233 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 932 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी विशेष मदत आयुक्त नियंत्रण कक्षात जाऊन मदतकार्याचा आढावा घेतला जात आहे. भीषण अपघाताच्या संदर्भात पंतप्रधान मंत्री यांनी तात्काळ माहिती घेऊन योग्य ती कारवाई आणि जखमींवर उपचार सुरू केले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या