Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत मोफत दिव्यांग तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; खा. डाॅ.प्रितमताई मुंडेंचा पुढाकार

 


वंचित,उपेक्षित घटकांची सेवा करण्याचा हा आमचा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून सुरू | खा. मुंडे


दिव्यांगांचे कष्ट कमी व्हावेत यासाठीच हा सेवायज्ञ - पंकजाताई मुंडे


गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व भारत सरकारच्या समाजकल्याण विभागाने केले आयोजन


परळी वैजनाथ | प्रतिनिधी

दिव्यांगांना केवळ कुबडया देऊन चालणार नाही तर सरकारने त्यांना स्वाभिमानानं जगण्याची संधी दिली पाहिजे, त्यांना आधार आणि ताकद देण्याची आज खरी गरज आहे, त्यांचे कष्ट कमी व्हावेत यासाठीच आमचा हा सेवायज्ञ असल्याचं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.


   गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व सामाजिक न्याय विभाग भारत सरकार आणि समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त सहकार्याने उप जिल्हा रूग्णालयात  दिव्यांगासाठी आयोजित केलेल्या मोफत पूर्व तपासणी शिबीराचे उदघाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे तसेच वैद्यकीय अधिकारी व भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


   पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, वंचित, उपेक्षित घटकांची सेवा करण्याचा हा आमचा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. लोकनेते मुंडे साहेब असताना देखील विविध माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवला होता व तो आजही सुरू आहे.  ३० मे ते ३० जून दरम्यान केंद्र शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ गोरगरिबांपर्यंत पोचावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महासंपर्क अभियान राबवले जात आहे, त्याचाच हा उपक्रम एक भाग आहे.दिव्यांगांना आधार देण्याची आज खरी गरज आहे, त्यांच्या मागे ताकदीने उभा राहिलं पाहिजे. सरकारने केवळ कुबडया न देता त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी द्यावी.मी मंत्री असतांना अनाथांना आरक्षण देण्याचं काम केलं. सरकारने दिव्यांगांना सरसकट मदत दिली पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करेल असे पंकजाताई म्हणाल्या.


*दिव्यांगांशी साधला संवाद*

---------- 

तपासणी शिबीरात महिला, पुरूष, ज्येष्ठ व लहान मुले सहभागी झाले होते, या सर्व दिव्यांगांची पंकजाताई मुंडे यांनी भेट घेतली व आस्थेने विचारपूस करून त्यांचेशी संवाद साधला तसेच त्यांच्या तब्येतचीही चौकशी केली. पंकजाताईंच्या या कृतीने दिव्यांग बांधव भारावून गेले होते.

*अंबाजोगाईत हे गैरकृत्य |या दलालाच्या माध्यमातून आजही राजरोसपणे भ्रष्टाचार सुरुच..*

https://aplaepaper.blogspot.com/2023/06/blog-post_45.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या