Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माणुसकीची लक्तारे वेशीला टांगली का?

 

beed

महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माणुसकीची लक्तारे वेशीला टांगली का?

सणासुदीत परळी शहरातील शहरातील लाईट गायब का?

सोशल मीडियाच्या माध्यमातून MSEB वर टीकेची झोड


महावितरण कार्यालयात नागरिकांचे निवेदन स्वीकारायला कोणी नाही म्हणून शेवटी भिंतीला निवेदन चिटकून नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

 परळी शहरातील लाईट ऐन सणासुदीत गायब झाल्याने परळी शहरातील नागरिक त्रासले असून एम एस ई बी म्हणजे परळी परिसराला असलेला अभिशाप असल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.तेआक्रमक दिसत आहेत.

   सविस्तर माहिती अशी की, सध्या शहरामध्ये मंगळागौरीची व गणेशोत्सवाची रेलचेल चालू असून याच काळात महिला व लहानथोर मंडळी शहरात वावरत आहेत त्यांच्या सुरक्षा धोक्यात आली असून एम एस ई बी च्या या गलथन कारभाराचा आता अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.

 

 आंधळी कोशिंबीरचा खेळ खेळणाऱ्या महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माणुसकीची लक्तारे वेशीला टांगली असून गोरगरिबांच्या घरातील दिवे विजून  सणासुदीला घरात अंधार करणाऱ्या या नराधमाना शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचे मेसेज व भावना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत 


तसेच समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या गौराई चे आज आगमन होत आहे, मात्र गेली अनेक तासापासून शहरातील लाईट गायब झाल्याने शहरातील नागरिक आक्रमक झाले असून सोशल मीडियावरती पोस्टचा पाऊस पडत आहे.


सोशल मीडियावर नागरिक आक्रमक होताना दिसत असून ऐन सणासुदीत लाईट गायब ..? असे म्हणत MSEB वर नागरिकांनी टीकेची झोड उठवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

vijay म्हणाले…
खाजगीकरण एकमेव मार्ग