Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

झाडांना राखी बांधून शाळेत रक्षाबंधन साजरे

 

माजलगाव,

BEED | स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली अद्याप रेल्वेच नाही     https://bit.ly/3Jz4qco

माजलगाव सिंदाफणा पब्लिक स्कूल येथे झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. निसर्गात झाड किती महत्त्वाची भूमिका बजावते, त्याची किती गरज असते. याची सर्वांना जाणीव आहे. प्रत्येक झाड जगले पाहिजे, वृक्षाचे संवर्धन झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य अन्वर शेख यांनी केले. 


सजीवांचे रक्षण करणाऱ्या निसर्गाने मानवजातीचे रक्षण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थी झाडाला राखी बांधतात आणि भाऊ मानतात, आम्हाला तुमची गरज आहे, असे मत वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा केला. 


भविष्यात मानवाच्या संरक्षणासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जीवसृष्टीचे रक्षण करण्याची गरज असल्याने वटवृक्षांची लागवड करून या अस्तित्वात असलेल्या वृक्षांची निगा राखून त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे. झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी राख्या बांधण्याचा वेगळा उपक्रम साजरा केला. मराठवाड्यातील सर्वात उंच "विशाल तिरंगा ध्वज" जो या शहरात फडकणार

https://bit.ly/3BNxGu7


मानवाचे रक्षण करणाऱ्या या निसर्गाचे रक्षण करावे असे आवाहन वरुण तौर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.यावेळी प्रवीण सोळंके, दीपक माने, पांडुरंग तोडकर, रामेश्वर जाधव, पुरुषोत्तम सोळंके यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   Live दर्शन |थेट प्रभू वैद्यनाथाच्या गाभाऱ्यात..दर्शन

https://bit.ly/3zuxSf1 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या