Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Goodnews ! ‘आधार कार्ड’ धारकांसाठी ‘’ गिफ्ट, ‘UIDAI’ देणार ‘रोख’ ३० हजार रुपये..काय अटी जाणून घ्यायचं तर..वाचा!


 तुम्ही आधारकार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. भारत सरकारच्या अधिकृत UIDAI कडून आपल्याला ३०, ००० रुपयापर्यंतचे बक्षीस मिळू शकते. आधारकार्डची जनक असलेल्या यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ़ इंडिया (UIDAI) या संस्थेने एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. UIDAI कडून ”My Aadhaar Online Contest” या स्पर्धेचे आयोजन केले असून १८ जून ते ८ जुलै या तारखेदरम्यान या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. आधारकार्ड असणारा प्रत्येक भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. या स्पर्धेतून ४८ विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना बक्षीस दिले जाईल.
https://www.facebook.com/notes/aadhaar/myaadhaaronline-contest-terms-conditions/2435648466719046/
या इमेलवर पाठवा व्हिडीओ
जर तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला आधारच्या कोणत्याही एका सेवेविषयी ३० सेकंदांपासून २ मिनिटांपर्यंत ऍनिमेटेड व्हिडीओ तयार करावा लागेल. व्हिडीओ हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बनवता येईल. व्हिडीओ तयार केल्यानंतर UIDAI च्या
media.division@uidai.net.in या इमेलवर पाठवावा लागेल.
फुल HD मध्ये व्हिडीओ पाहिजे
UIDAI ने सांगितले की व्हिडीओ फुल HD किंवा हाय रिजॉल्युशन मध्येच असला पाहिजे. एमपी4, एवीआई, एफएलवी, डब्लूएमवी, एमपीईजी किंवा एमओवी मध्ये व्हिडिओचा फॉरमॅट असला पाहिजे. ज्या व्हिडीओचे रिजॉल्युशन १९२०×१०८० px असेल त्या व्हिडीओंना प्राधान्य देण्यात येईल.

हे करू नका
स्पर्धकांनी व्हिडीओ तयार करून UIDAI च्या सोहलमिडीया पेजवर शेअर करायचा नाही आहे. कोठूनही कॉपी केलेला व्हिडीओ पाठवायचा नाही आहे. व्हिडीओ तयार करताना आधार नंबर आणि इतर माहितीला ब्लर करायचे आहे. व्हिडीओच्या गुणवत्ता सोबत ऑडिओची गुणवत्ताही पडताळली जाईल. UIDAI ३१ ऑगस्ट पर्यंत विजयी स्पर्धकाला इमेलवरून सूचना देईल.
हे आहे बक्षीस
हा व्हिडीओ १५ कॅटेगरीत पाठवता येऊ शकतो. प्रत्येक कॅटेगरीत पहिला पुरस्कार २०,००० रुपये, दुसरा पुरस्कार १०,००० रुपये आणि तिसरा पुरस्कार ५,००० रुपये असा असेल. या शिवाय तिन्ही कॅटेगरीना एकत्र करून ३०,००० रूपयाचा प्रथम पुरस्कार दिला जाईल. द्वितीय पुरस्कार २०,००० रुपये आणि तृतीय पुरस्कार १०, ००० रुपयांचा असेल. स्पर्धक एकापेक्षा जास्त कॅटेगरीत व्हिडीओ पाठवू शकतात.