Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यस्तरीय स्पर्धेत सहशिक्षक अनुपकुमार कुसुमकर यांच्या व्हिडीओ चा तालुक्यातून द्वितीय क्रमांक

परळी/ प्रतिनिधी 


विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास सातत्याने प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये राज्यातील उपक्रमशील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा येथील सहशिक्षक अनुपकुमार कुसुमकर यांचा स्वनिर्मित व्हिडीओ हा तालुका स्तरावर द्वितीय आला आहे.

राज्यातील शिक्षकांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत मागील वर्षी राज्यातील सर्वच शिक्षकांसाठी स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत परळी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयातील विज्ञान विषयाचे शिक्षक श्री.कुसुमकर सर यांनी इयत्ता 6 वि ते 8 वि या गटात वेगळा प्रयोग करत मराठी भाषा विषय निवडुन शैक्षणिक व्हिडीओ तयार करून राज्य स्तरावर पाठवला त्याच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून त्याचा हा शैक्षणिक व्हिडीओ परळी तालुक्यातुन द्वितीय क्रमांक प्राप्त करणारा ठरला.अनुप कुसुमकर सरांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्याची नुकतीच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत ई-आशय मुल्यांकन समिती वर निवड देखील झालेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या