Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एकच खळबळ ! अनोळखी व्यक्तीचा गळा आवळून खून ;तर तीघांकडून एकाचा धारदार शस्त्रांनी वार करून हत्या.



 पुणे // पुण्यातील धनकवडी येथे तीघांकडून एकाचा किरकोळ वादातून धारदार शस्त्रांनी वार करून शुक्रवारी रात्री खून करण्यात आला. तर कोंढवा येथे आईएमडी स्कूलच्या जवळ असलेल्या मिक्सर प्लांटच्या आवारात एका अनोळखी व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आला. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
धनकवडीत धारदार शस्त्रांनी वार करून खून
काल रात्री धनकवडी शेवटच्या बसस्टॉपजवळ रामदास शामराव शिळीमकर (वय ३८ रा. आई माता फरसाण, दुकानासमोर आंबेगाव) यांचा तीन जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला. तर पोलिसांनी तिघांचा शोध सुरु केला आहे.
कोंढव्यात गळा आवळून खून
कोंढवा परिसरातील कात्रज कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूलसमोरील एका मैदानात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास स्थानिकांना एक मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. गळा आवळून खून केल्यानंतर हा मृतदेह येथे टाकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला असून मयताची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.