Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना स्वतःची आवड, क्षमता व कौशल्य लक्षात घ्यावे | राहुल कदम

 आपला ई पेपर गढी प्रतिनिधी


  

विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची निवड करताना स्वतः मधील क्षमता, आवड आणि कौशल्य यांचा विचार करूनच योग्य ते करिअर निवडण्याचा सल्ला माजलगाव येथील  सिंदफणा पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य राहुल कदम यांनी दिला. ते गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.


सविस्तर वृत्त असे की, विद्यार्थी जीवनात चांगल्या शिक्षणासोबत उत्कृष्ट मार्गदर्शन मिळणे फारच गरजेचे असते. याचसाठी शनिवार रोजी (दि. १२) इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या सुरुवातीला नवोदय विद्यालयाचे वरीष्ठ शिक्षक बी. आर.कांबळे यांनी उपप्राचार्य राहुल कदम यांचा परिचय करून दिला.


यावेळी राहुल कदम यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या क्षेत्रात अभिरुची ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रात कसे भवितव्य घडवावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निवारण करून विद्यार्थ्यांना स्वतःचे भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. 

यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्या  सुनीता साखरे मॅडम, वरिष्ठ शिक्षक बी. आर.  कांबळे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*अपघात | परळी गंगाखेड रोडवर दुचाकीचा अपघात....*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_84.html*

*हुतात्म्यांचे छायाचित्र, इतर महत्वाचे दस्तावेज पत्र पाठविण्याचे आवाहन |अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_77.html*

*परळीत पोदार लर्न स्कूल येथे मुलींच्या वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ.सुनिता झंवर यांनी केले मार्गदर्शन* 

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_56.html*

*धक्कादायक भरधाव ट्रकची ओमनीला धडक |बीडचे दिवाणी न्यायाधीश व चालक यांचा जागीच मृत्यू..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_12.html*

धक्कादायक *धमकीचा |Mail|पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देणार ! बॉम्बस्फोट घडवून आणणार..|*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/mail.html*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*