Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गोदापात्रातील अवैध वाळू उपसा रोखा, लाभार्थ्यांना वाळू पुरवठा करा |उत्तम माने

 आपला ई पेपर | परळी प्रतिनिधी 


 

परळी तालुक्यातील पोहनेर, बोरखेड, डिग्रज आदी ठिकाणी गोदापात्रात होणारा अवैध वाळू उपसा महसूल प्रशासनाने रोखावा व शासनाच्या नवीन वाळू धोरण विविध योजनेसाठी व गरजवंतांना वा पुरवठा मागणी भाजपा किसान मोर्चेचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम माने यांनी परळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.


याबाबत उत्तम माने यांनी परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे भवनात पत्रकारांशी वाळू प्रश्नावर संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 2 मार्च 2023 रोजी सरकारने नवीन वाळू धोरण जाहीर केले मात्र अद्याप या धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करोडो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. तसेच काळ्या बाजारात वाळू एक हायवा चाळीस ते पन्नास हजार रुपयांना विक्री केला जात आहे. महसुल प्रसासनाने अवैध उपसा थांबवावा.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत दर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरांचे कामे चालू असलेल्या लाभार्थ्यांना वाळू पुरवठा केला पाहिजे.नुकतेच महाराष्ट्र सरकारने अधिकृत वाढू धोरण जाहीर केले आहे. 

या धोरणानुसार कोणालाही वाळू मिळत नाही. शासनाने ठरवून दिलेल्या 600 रुपये दरा मिळावा. विशेषतः घरकूल लाभार्थी वैयक्तिक बांधकाम व ग्रामपंचायत अंतर्गत असलेले विकासात्मक कामे व वैयक्तिक कामे यांना प्राधान्याने वाळू पुरवठा करावा. असा आदेशही राज्य शासनाने पारित केला आहे.त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील वाळू माफियांशी संगनमत असलेले महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन कारणीभूत ठरत आहेत. गेल्या तीन वर्षापासून संबंधित यंत्रणेला पाठपुरावा करून देखील करून देखील ठोस अशी कारवाई करण्यात आलेली नाही.

मागणीनुसार बीड जिल्ह्यातील विविध विकासकांना महसूल प्रशासन पुरवठा करावा, याबाबत आवश्यक ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने मागणी अर्ज मागवून घ्यावेत व आलेल्या अर्जानुसार वाळूचे वाटप करावे असेही उत्तम माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

*संपूर्ण गावात दहशत... गोदापात्रातील अवैध वाळू उपसा रोखा, लाभार्थ्यांना वाळू पुरवठा करा |उत्तम माने*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_45.html*

*बदनामी परळीची..आरोपी परभणीचे*

*परळी गोळीबार प्रकरणात|  परभणीतील तिघां आरोपींना केली अटक*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/beed.html*

*| Breaking | हेडलाईन्स न्यूज*
*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |*आपली बात |आपली बातमी | Breaking |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या