माजी कृषीमंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याने उपलब्ध झाले अनुदानित बियाणे !
बियाणे,खते व औषधांची विक्री जास्त दराने करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी !
आपला ई पेपर / परळी प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानित बियाण्यांसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाने परमिट देऊन सुद्द्धा कृषी सेवा केंद्रावर गेल्यावर बियाणे मिळत नसल्याने कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले,या आंदोलनामुळे व माजी कृषीमंत्री आ.धनंजयजी मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे कालच सोयाबीनचे बियाणे आले व आज ११ जून रोजी परळी शहरातील संजय कृषी सेवा केंद्र,किसान सेंटर व रुक्मिणी ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्रावर सकाळी ९ वा पासून कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात बियाणांचे वाटप सुरु करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त कि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यानी केलेल्या ऑनलाईन अर्जानुसार प्रथम येनारास प्रथम प्राधान्य या नियमाप्रमाणे मार्च खरीप हंगाम २०२६ साठी परळी तालुक्यातील १७९२ शेतकऱ्यासाठी ९८३ क्विंटल बियाणे मिळणे आवश्यक होते परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ ३५४.२५ क्विंटलच बियाणे मिळाले,त्यामुळे उर्वरित ६२८ .७५ ची आवश्यकता असताना सदरील बियाणे महाबीज कडून मिळाले नाही व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने या बियाणाची मागणी सुद्धा केली नाही,त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मागील ५ दिवसापासून मोंढा मार्केट मधील संजय कृषी सेवा केंद्र,किसान सेंटर व रुक्मिणी ट्रेडर्स या अधिकृत कृषी सेवा केंद्रावर आपले काम सोडून दिवस - दिवस बसत होते,परंतु त्यांना बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून आपली मागणी मांडली,त्यावेळी ०९ जून २०२६ रोजी तालुका कृषी अधिकारी यांनी उर्वरित ६२८ क्विंटलची मागणी केली,यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कृषीमंत्री यांना अनुदानित बियाणांचा विषय सांगितला असता त्यांनी तात्काळ दखल घेऊन राज्याचे कृषीमंत्री मा.ना.दत्तामामा भरणे साहेब व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या सोबत संपर्क करून परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे त्वरित देण्याची मागणी केली,शेतकऱ्यानी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे व माजीमंत्री आ.धनंजयजी मुंडे यांच्या वरिष्ठ स्तरावरील पाठपुराव्यामुळे उर्वरित बियाणे तालुक्याला उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे,त्याच बरोबर सर्व प्रकारचे बियाणे,खते व औषधांची विक्री जास्त दराने करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.




Social Plugin