Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात |भरधाव ट्रकची ओमनीला धडक |बीडचे दिवाणी न्यायाधीश व चालक यांचा जागीच मृत्यू..

आपला ई पेपर |रेणापूर |


उदगीर मार्गावरील सेवादासनगर तांडा येथे भरधाव ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश आणि त्यांचा चालक जागीच ठार झाल्याची घटना   शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे..हा अपघात  एवढा भीषण हाेता की, यात ओमनी कारचा पार चेंदामेंदा झाला आहे,

पाेलिसांनी दिलेल्या माहितीवरुन उद्धव वसंत पाटील रा.अजनसोंडा खु.ता. चाकूर हे सध्याला बीड येथे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत हाेते.शुक्रवारी ते चालक बळी नंदकुमार टमके रा. अजनसोंडा खु.ता.चाकूर यांच्यासाेबत ओमनीने एमएच १७ बीव्ही १२५७ गावाकडे निघाले हाेते..


दरम्यान,रेणापूर- उदगीर मार्गावरील आष्टामाेडकडे जाताना सेवादासनगर तांडा येथे शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने एमएच २४ एबी ८४०१ त्यांच्या वाहनाला जाेराची धडक दिली.यामध्ये न्यायाधीश पाटील आणि चालक टमके हे जागीच ठार झाले.हा अपघात एवढा भीषण हाेता की,ट्रक शंभर फुटावरून चुकीच्या दिशेने येत न्यायाधीशांच्या वाहनावर धडकला. घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला आहे.घटनास्थळी तांड्यावरील युवक,नागरिकांनी धाव घेतली.ओमनी वाहनाचा पार चेंदामेंदा झाल्याने त्या दाेघांनाही बाहेर काढण्यासाठी दीड तासाचा अवधी लागला.रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.

एक वर्षभरापूर्वीच झाली हाेती निवड…

न्यायाधीश उद्धव पाटील हे गत अनेक वर्षांपासून लातूर येथे वकिली करत होते.दरम्यान,त्यांची एक वर्षापूर्वीच न्यायाधीश म्हणून निवड झाली हाेती.सध्या बीड जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.शनिवार- रविवार सुटी असल्याने ते गावाकडे रेणापूर- उदगीर मार्गावरून शुक्रवारी निघाले होते.मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. यातच ते आणि चालक जागीच ठार झाले.

*| Breaking | हेडलाईन्स न्यूज*

*https://aplaepaper.blogspot.com*
*आपला@पेपर |* *आपली बात |आपली बातमी | Breaking |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*


धक्कादायक *धमकीचा |Mail|पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देणार ! बॉम्बस्फोट घडवून आणणार..|*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/mail.html*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या