Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार स्कूल येथे मुलींच्या वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ.सुनिता झंवर यांनी केले मार्गदर्शन

आपला ई पेपर |परळी|

सध्या किशोरवयीन मुला-मुलींना वाढत्या वयात शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक बदला संदर्भात अनेक प्रश्न नेहमीच भेडसावतात असतात.त्या प्रश्नांवर आजही आई-वडील, शिक्षक अथवा अन्य कोणाशी मनमोकळेपणाने बोलले जात नाही किंवा मैत्रिणी सोबतही त्या गोष्टी शेअर करता येत नाहीत अशा वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ.सुनिता झंवर यांनी आज दि.12 शनिवार रोजी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथील किशोरवयीन मुलींना वाढत्या वयातील विविध समस्या व उपाय बाबत सखोल मार्गदर्शन केले.



राजस्थानीज पोदार लर्न स्कूल शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या मुलींसाठी आज हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मुलीचे वाढते वय 10 ते 16 वर्षे वयोगटातील हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.या काळात मुला-मुलींच्या अडचणी व समस्यांची जाणीव होऊन त्यांची समाधानकारक उत्तरे मिळणे गरजेचे असते.त्यातून त्यांच्या भावी जीवनावर सकारात्मक परिणाम घडण्यास मदत होते.


याच उद्देशाने आज दि.12 शनिवार  रोजी राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सचिव बद्रीनारायण बाहेती,सहसचिव धीरज बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत किशोरवयीन मुलींना वाढत्या वया संदर्भातील असणाऱ्या विविध समस्या व उपाय बाबत मार्गदर्शन व मदत व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अशी माहिती शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थीनी कल्याण समिती प्रमुख सौ.भाग्यश्री गुट्टे,शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


*धक्कादायक भरधाव ट्रकची ओमनीला धडक |बीडचे दिवाणी न्यायाधीश व चालक यांचा जागीच मृत्यू..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_12.html*

धक्कादायक *धमकीचा |Mail|पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देणार ! बॉम्बस्फोट घडवून आणणार..|*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/mail.html*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या