Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED |परळी गोळीबार प्रकरणात| परभणीतील तिघां आरोपींना केली अटक

 आरोपी परभणीचे, बदनामी परळी..



आपला ई पेपर |परभणी|

परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील एका हॉटेलमध्ये सिगारेटचे पैसे मागितल्याने चौघांनी गोळीबार केला होता. ही घटना ९ ऑगस्ट रोजी घडली होती. यातील तिघांना परभणी येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई परळी ग्रामीण पोलिसांनी केली.

इमरान आयमुर शेख (वय २४ रा.नाशिक), सुफियन अन्सारी शरीफ अन्सारी (वय २०), सय्यद फैयास सय्यद सिराज (वय २१ दोघेही रा. दर्गा रोड, परभणी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. परळी- अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडी जवळील हॉटेल यशराजमध्ये सिगारेट घेण्यासाठी रात्री ११ वाजेच्या सुमारास लातूरहून अंबाजोगाईमार्गे परळी परभणीकडे एका गाडीतून निघालेले चौघे जण थांबले. हॉटेल मॅनेजरला सिगारेटचे पॉकेट मागितले. पॉकेट दिल्यावर त्याने १५० रुपये मागितले. यावर मॅनेजर नरेश निशाद यास मारहाण करत दोन गोळ्या झाडल्या.


...यांनी केली कारवाई


ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अप्पर अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले, सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नारायण गीते, हवालदार केकान, पोलिस नाईक नवनाथ हरगावकर, सुनील अन्नमवार व मुंडे यांनी केली.


सुदैवाने यात मॅनेजर बालंबाल बचावला होता. याप्रकरणी हॉटेल चालक विलास आघाव यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर लगेच पोलिसांनी आरोपी ज्या गाडीने आले होते, त्या गाडीचा शोध घेतला. ही गाडी परभणी येथील असल्याचे समजले. त्याप्रमाणे पोलिसांनी परभणी गाठली. तेथून सर्व माहिती घेत तिघांना बेड्या ठोकल्या. यातील चौथा आरोपी अजूनही फरार असून, परळी ग्रामीण पोलिस शोध घेत आहेत..

*अपघात | परळी गंगाखेड रोडवर दुचाकीचा अपघात....*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_84.html*

*हुतात्म्यांचे छायाचित्र, इतर महत्वाचे दस्तावेज पत्र पाठविण्याचे आवाहन |अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_77.html*

*परळीत पोदार लर्न स्कूल येथे मुलींच्या वाढत्या वयातील समस्या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ सौ.डॉ.सुनिता झंवर यांनी केले मार्गदर्शन* 

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_56.html*

*धक्कादायक भरधाव ट्रकची ओमनीला धडक |बीडचे दिवाणी न्यायाधीश व चालक यांचा जागीच मृत्यू..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_12.html*

धक्कादायक *धमकीचा |Mail|पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देणार ! बॉम्बस्फोट घडवून आणणार..|*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/mail.html*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

सौजन्य लोकमत न्यूज टीम 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या