Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

SSC | यशवंत विद्यालय हिवरे बाजारची १०० टक्के निकालाची परंपरा कायम..

 


आपला पेपर

नगर यशवंत माध्यमिक विद्यालय हिवरे बाजारच्या इयत्ता दहावीच्या मार्च २०२३ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून याहीवर्षी यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.चि.सुयश बना पादिर९४.४० टक्के गुण मिळवून टाकळी (खातगाव) केंद्रात तसेच विद्यालयात प्रथम आला व चि.यश दीपक ठाणगे व कु.तनुजा संतोष ठाणगे हे दोन विद्यार्थी प्रत्येकी ९२.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय तर चि.सूरज बाबासाहेब ठाणगे हा ९०.८० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. 


एकूण ४३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी २८ विद्यार्थी विशेष गुणवत्ता प्राप्त आहेत व ९ विद्यार्थी प्रथम श्रेणी व ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत  उत्तीर्ण झाले आहेत. यासाठी त्यांना मुख्याध्यापक श्री.मुरलीधर अमृते तसेच शिक्षक श्री.दिपक ठाणगे,श्री.कैलास खैरे, श्री.नंदकुमार झावरे व सौ.नीता सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पदमश्री डॉ.पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य,सौ.विमल ठाणगे सरपंच,श्री.छ्बुराव ठाणगे चेअरमन,रामभाऊ चत्तर व्हा चेअरमन श्री.हरिभाऊ ठाणगे सर श्री.एस.टी.पादीर (सर) अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,बाबासाहेब गुंजाळ चेअरमन दूध डेअरी , श्री.रोहिदास पादिर सर,सहदेव पवार गुरुजी,दत्तात्रय ठाणगे सर व सर्व पालक व  ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या