Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पत्रकार हा समाजाचा कणा आहे...खऱ्या अर्थाने समाजाचे सेनापती अँड.माधव अप्पा जाधव



पत्रकार हा समाजाचा कणा आहे.आणि पत्रकारिता म्हणजे एक लोकशाहीचा एक चौथा आधार स्तंभ म्हणून खऱ्या अर्थाने समाजाचे सेनापती म्हणून या ठिकाणी काम करत असतात कारण समाजासाठी लढत असतात आणि हे लढत असताना अनेक वेळेला आपल्यावरती अनेक प्रकारची संकट येतात आणि त्या संकटावर मात करून पञकार सत्याची कास धरून, पत्रकारिता या क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. येवढीच अपेक्षा...

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय अधिवेशनाच्या निमित्ताने आज बीड येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त दिलीप खिस्ती यांना पत्रभुषण, सौ.मनिषा तोकले यांना समाजभूषण तर कल्याण कुलकर्णी यांना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर बीड येथील रहिवाशी असलेले मात्र सध्या नगर येथे दै.सकाळमध्ये कार्यरत असलेले सुर्यकांत नेटके यांना स्व.सुंदरराव सोळंके स्मृती पत्रकारिता सेवागौरव पुरस्कार तसेच बीड येथील दै.राज्यलोकतंत्रचे उपसंपादक अनिल जाधव यांना स्व.प्रभाकरराव कुलकर्णी स्मृती श्रमिक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या