Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विशेष कौतुक |परळी औष्णिक विज केंद्रास ब्लॅक डायमंड अँवार्ड ने सन्मानित


मुंबईत एका समारंभात पाच लाख व प्रशस्तीपत्र स्वीकारले

परळी /प्रतिनिधी

औष्णिक वीज केंद्रात,कोळसा हाताळणी विभागाने गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कोल हँडलिंग प्लांट विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना ब्लॅक डायमंड अँवार्ड (१००० मेगावँट खाली) पुरस्काराने गौरवण्यात आले आहे .

       एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत आजपर्यंतच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या इतिहासातील सर्वांत जास्त  म्हणजे  ३०.२० लाख मेट्रिक टन कोळसा वाघीनी खाली करुन घेण्याचा विक्रम केला. याचबरोबर वर्षभरात एकुण ७५४ कोळसा मालगाड्या उतरून घेतल्या आहेत आणि विशेष म्हणजे वरील सर्व कार्य इष्टतम वेळेत म्हणजेच रेल्वेने ठरवुन दिलेल्या ५ तासाच्या मर्यादेच्या आसपास पुर्ण केले आहे. 

वरील उल्लेखनीय कामगिरी ही सर्व अडचणीवर यशस्वीपणे मात करून प्राप्त करण्यात आली. केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागाची ही कामगिरी संपूर्ण महानिर्मितीच्या इतर औष्णिक वीज केंद्रापेक्षा सरस म्हणजेच मागील आर्थिक वर्षात प्रथम क्रंमाकावर राहिली. संच क्रमांक ६,७,८ कोळसा हाताळणी विभागाने उत्कृष्ट  तांत्रिक  कौशल्याचा आणि उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर करुन ही किमया साध्य  केली. 

यामुळे राज्य शासनाच्या वतीने ब्लँक डायमंड अँवार्ड (१००० मेगावँट खाली) या पुरस्काराने बुधवारी (ता.०६) मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता सुरेश गर्जे यांनी स्विकारला.पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले. पुरस्कार समारंभास महानिर्मितीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी.अनबलगंण, श्री चांदुरकर, विश्वास पाठक, संचालक  (कोळसा विभाग) राजेश पाटील, संचालक संजय मारुडकर, संचालक श्री.थिट्टे, कार्यकारी संचालक अभयकुमार हर्णे, कार्यकारी संचालक पंकज सपाटे आदी मान्यवर उपस्थित होते. औष्णिक विज केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे आणि उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार यांनी वेळोवेळी केलेले अमुल्य मार्गदर्शन व सहकार्य यामुळे ही कामगिरी शक्य झाली .तसेच संच क्रं.६-७ चे कार्यकारी अभियंता सुरेश गर्जे  व संच क्रमांक ८ चे प्रभारी कार्यकारी अभियंता महादेव मुंडे  यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे  (संचलन विभाग), शाहूराज येवते  (सुव्यवस्था विभाग),  इमरान मनियार ,चंद्रकांत कोहाळे (विद्युत सुव्यवस्था विभाग) सर्व सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता (सुव्यवस्था व संचलन), सर्व कर्मचारी (सुव्यवस्था व संचलन) आणि सर्व कंत्राटदार यांची मेहनत कामी आली. परळी औषधी विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांनी विशेष कौतुक केले. तसेच या दैदीप्यमान कामगिरीचे सर्व स्तरावरुन कौतुक  होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या