Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

५ जून जागतिक पर्यावरण वृक्ष संवर्धन ही काळाची खरी गरज आहे

 




नगर / प्रतिनिधी 

नगर आदर्श गाव हिवरे बाजार येथे आज ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनक्षेत्रात १४०० तसेच गावठाण परिसरात आणि विविध संस्थाच्या परिसरात ६०० असे एकूण २००० वृक्षलागवडीचा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना व सुवर्णा माने उपवनसंरक्षक वनविभाग अहमदनगर आणि हिवरे बाजार येथील ज्येष्ठ नागरिक नानाभाऊ पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

सदर वृक्षलागवडीसाठी हिवरे बाजार येथील ज्या नागरिकांचे वय ८० वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना निमंत्रित करण्यात आले होते आणि प्रत्येकाने वृक्षलागवड करून शुभारंभ करण्यात आला.सदर वृक्षलागवडीसाठी सुरेश राठोड  वनपरिक्षेत्र अधिकारी नगर,  विमल ठाणगे सरपंच हिवरे बाजार,रामभाऊ चत्तर व्हा. चेअरमन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था हिवरे बाजार,दामोधर कारभारी ठाणगे व ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.          जागतिक पर्यावरण दिन हा उत्सव साजरा करण्याचे कारण म्हणजे मानवजातीला पर्यावरणाविषयी जागरूक करणे. वास्तविक, केवळ पर्यावरणामुळेच मानव आणि इतर प्राण्यांचे जीवन शक्य आहे. पर्यावरणात जर मानवाने समतोल राखला तर मानवजात सृष्टीत टिकून राहणार आहे. जगातील वातावरण सतत दूषित होत आहे, ज्याचा आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला आहे. हरीत ऊर्जचा वापर करणे,  पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. असे प्रतिपादन पदमश्री डॉ पोपटराव पवार यांनी केली.  

 वृक्ष संवर्धन ही काळाची खरी गरज आहे. त्यामुळे येणा-या पिढीसाठी आपण निश्चितच योगदान देऊ शकतो. या भावनेने उपक्रमामध्ये सर्वांनींच सहभागी व्हावे असे आवाहन पदमश्री पोपटराव पवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या