Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महाराष्ट्र विद्यालयाचा एस.एस.सी परीक्षेत यशाची परंपरा कायम

 


●माध्यमिक विभागाचा 97.30 % निकाल

परळी / प्रतिनिधी

ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या परळी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपली गुणवत्ता पुन्हा एकवेळ सिद्ध करून दाखवली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी 2023 बोर्ड परीक्षेत माध्यमिक विभागाचा 97.30 टक्के निकाल लागला आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत असून विविध स्पर्धा परीक्षा असो की बोर्ड परीक्षा शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.नुकताच जाहीर झालेला एस.एस.सी मार्च 23 बोर्ड परीक्षेत माध्यमिक विभागाचा 97.30  टक्के निकाल लागला असून चि.सोळंके चैतन्य गोपीनाथ हा 93.60 % गुण घेऊन सर्वप्रथम,कु.उमंग प्रतिभा अजय बुरांडे 93.40 % गुण घेऊन सर्व द्वितीय तर चि. देशमुख करण रावसाहेब 93.20 % गुण घेत तृतीय आला आहे.शाळेतील तब्बल 61 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी, 102 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थी आणि शाळेच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा चे सचिव, संचालक मंडळ यांनी शाळेचे प्राचार्य, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या