Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सकारात्मक भेट | गंगाखेड विधानसभेला सहकार्य करण्याचे आश्वासन...

 


गंगाखेड / प्रतिनिधी 

विधानसभेचे आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी काल उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुंबई येथील मेघदूत या शासकीय निवासस्थानी भेट दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, सुरू असलेली कामे, प्रलंबित कामे, भविष्यातील नियोजन, मतदार संघातील राजकीय स्थिती, आगामी धोरण अशा विविध विषयांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा दोघांमध्ये झाली. 

गंगाखेड विधानसभेला मिळत असलेले शासकीय सहकार्य व निधी यामुळे भेटीचे औचित्य साधून कार्यसम्राट आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे  यांनी मा.ना.देवेंद्रजी फडणवीस  यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. 

याप्रसंगी आ.डाॅ.रत्नाकर गुट्टेच्या धोरणात्मक कामाबद्दल मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच भविष्यातही गंगाखेड विधानसभेला बहुमोल सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या