Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महान संतमाऊली दादांना सर्व सिद्धी प्राप्त |भरत महाराज जोगी

 


परळी/ प्रतिनिधी

विसाव्या शतकातील महान संत वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज चाकरवाडीकर यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या माऊलींनी अनेकांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासोबत त्यांना जगण्यासाठी पाठबळ दिले असे मत ह.भ.प भरत महाराज जोगी यांनी व्यक्त केले.

मराठवाडा साथी बियाणी परिवार अभा वारकरी मंडळ यांच्यावतीने माऊली महाराजांच्या 23 व्या स्मृतिद्रा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सवात भरत महाराज जोगी बोलत होते.


चित्ती तुझे पाय डोळा रूपांचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णवे गुण या अभंगावर भरत महाराज जोगी बोलत होते. चाकरवाडी येथे शांती ब्रह्म माऊली महाराजांच्या माध्यमातून आजही अखंडपणे अन्नदान चालू असून आपल्या जीवनातून इतरांचे जीवन कसे सुखी होईल यावर माऊली महाराज काम करीत होते असेही जोगी महाराज म्हणाले. 



आपल्या कीर्तनात पुढे बोलताना माऊलींचे अनेक प्रसंग जोगी महाराजांनी समोर ठेवले टाळ मृदुंगाचा गजर करीत पार पडलेल्या या कीर्तनातून भरत महाराज यांनी माऊली  महाराजांचा जीवनपट समोर ठेवला. महाराजांचे काही संदर्भ समोर ठेवत जोगी महाराज म्हणाले की माऊली महाराज हा आपल्या सर्वांचा श्वास आहे सामान्य भक्तांसाठी माऊली महाराज आजही आपल्या सर्वांसोबत आहे असा विश्वासही भरत महाराज जोगी यांनी व्यक्त केला कीर्तनाच्या प्रारंभी माऊली महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


सप्ताहाचे सर्व कार्यक्रम वैद्यनाथ सह.औद्योगीक वसाहत,श्रीनाथ रोड परळी येथे होत आहेत.असून किर्तनाची वेळ दररोज रात्री 8 ते 10 अशी आहे. दरम्यान या अंतर्गत होणाऱ्या सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन बियाणी परिवाराच्या वतीने चंदुलाल बियाणी, सतिश बियाणी, जगदीश बियाणी तसेच मार्गदर्शक ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या