Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती ढोल ताशाच्या गजरात उत्साहात साजरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास  ठक्कर, धर्माधिकारी,प्रा.दुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती  उत्साहात साजरी

परळी वैजनाथ प्रतिनिधी / आपला पेपर परळी वैजनाथ येथील श्री वैजनाथ मंदिर येथे आज बुधवार दिनांक31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ढोल ताशाच्या गजरात भंडारा उधळत उत्साहात साजरी करण्यात आली. 

शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )बीड उप जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. अतुल दुबे सर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की,

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा 'तत्वज्ञानी राणी ' म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या अश्या ह्या महाराणी राजमाता होत्या असे सांगितले.

बाजीराव भैया धर्माधिकारी म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता,पराक्रमी योद्धा,आणि सर्वश्रुत धनुर्धर ह्या सर्व गोष्टीमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपाटावर स्त्री व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याचा 'तत्वज्ञानी राणी ' म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या होत्या असे सांगितले.

प्रा.अतुल दुबे म्हणाले की,ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या.सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला होता असे सांगितले.

यावेळी माजी शहर संघटक संजय कुकडे,माजी नगरसेवक अनिल अष्टेकर,वैजनाथ सोळंके,जालिंदर नाईकवाडे, उपशहर प्रमुख किशन बुंदेले, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर  विभाग प्रमुख सुरेश परदेशी, प्रा. उद्धव मुळे,अमित कचरे, योगेश जाधव,जगदीश पवार, योगेश घेवारे, व्यंकटेश चव्हाण, सचिन लोढा, रवि देवकर, लक्ष्मण बोले, रघुनाथ बोले, शंकर गवते, राजाभाऊ गवते,अनिल बोले, आकाश गाडे, रवि बोले, अनंत बोले, सोमनाथ गवते, गणेश जावडे, गणेश होळकर, भगवान बोले, सुरेश होळकर, प्रकाश देवकर, लक्ष्मण मुंडे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या