Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज |प्रा.अतुल दुबे

परळीत जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने जयंती साजरी

परळी /प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत राष्ट्र, भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे ही राष्ट्र निर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे. 


आज देशाला स्वा.सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अतुल दुबे यांनी व्यक्त केले.

जय महाराष्ट्र प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित वीर सावरकर जयंती  रविवार दि 28 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा.अतुल दुबे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे श्री दुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करत अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी बोलताना प्रा.अतुल दुबे  म्हणाले,भारतातून ही जातीयता जेव्हा नष्ट होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज,राष्ट्र सुस्थिर होईल. भारतीय जातीव्यवस्था,अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्वा. सावरकर यांनी रत्नागिरीत केलेली कार्ये अत्यंत महत्वाची आणि गौरवपूर्ण आहेत. स्वा. सावरकर यांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत ही राष्ट्रीय परिषद होत आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. स्वा. सावरकर हे सामाजिक समतेचे मोठे पुरस्कर्ते होते.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे बबन ढेंबरे, अमित कचरे,सचिन लोढा, बजरंग औटी,मनिष जोशी,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे, सिद्धार्थ गायकवाड,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार, विकास देवकर, आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या