Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आदर्शगाव हिवरेबाजार मध्ये विनायक दामोदर सावरकर जयंती



आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा  

हिवरेबाजार /आपला पेपर

आज देशाला स्वा.सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दि.28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. जि.प. प्राथमिक शाळा आणि यशवंत माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शोभाताई पवार यांनी किशोरवयीन तसेच( एन.सी. सी ) राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुलींशी संवाद साधला.


या कार्यक्रमाची सुरुवात विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकात शोभाताई पवार यांनी या दिवसाचे महत्त्व आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश स्पष्ट केला. मासिक पाळी चक्राची शास्त्रीय माहिती निता सोनवणे यांनी ’स्त्री जननसंस्था आणि स्त्री बीजकोषचा छेद’ या आकृतीच्या सहाय्याने सविस्तरपणे ढवळे मॅडम यांनी पाळी संदर्भातील गैरसमज आणि अंधश्रद्धा यांची माहिती दिली आणि हे सर्व टाळण्यासाठी महिलांनी कोणता विचार करावा, हेही सांगितले.


पाळीसंदर्भात स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. या वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन सरपंच सौ.विमलताई ठाणगे यांनी केले.पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी या कार्यक्रमात विशेष सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमानंतर पोस्टर्स स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती होण्यासाठी तसेच मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी कशाप्रकारे घ्यावी याविषयी मार्गदर्शन होण्यासाठी 28 मे हा दिवस’ जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
एक अभिनव उपक्रम