Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वैद्यनाथ विद्यालयच्या 1992च्या बॅचचे स्नेहमिलन संपन्न


दहावीचे वर्गमित्र एकत्र येत स्नेहमिलन सोहळा केला साजरा..

परळी / प्रतिनिधी 

मैत्रीचं जग हे एक वेगळाच विश्व असत... एक मित्र म्हटलं की आठवणी आल्या आठवणी म्हणलं की.. किस्से आले या अनेक किश्यातून... जीवन घडत. तेच जीवनातील खरे क्षण असतात.

परळीतील माधवबाग येथील वैधनाथ विद्यालय सन 1992 च्या दहावी बॅचचे वर्गमित्र बरेच वर्षानंतर एकत्र येत स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आज दि 28 रोजी परळीतील भागवत मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला यात उत्साहात दिवसभर नव्या जुन्या शालेय जिवनातील गोष्टींना उजाळा देत स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाले. शालेय मित्र भेटल्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला असे मत श्री.सचिन मुंडे( न्यायाधीश मुंबई विभाग) यांनी व्यक्त केले.


वैधनाथ विद्यालय विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे अनेक वर्षांनतर मित्र मंडळी यांच्यावतीने  1992 च्या 10 वी वर्गमित्रांचे स्नेहमिलन आज रविवार, दि.28 रोजी परळी येथे उत्साहात संपन्न झाले 

 संघर्ष तर हा प्रत्येकाला ठरलेला असतो परंतु संघर्षात सदैव साथ देणारे अव्यक्त होणारे मित्र... किंवा व्यक्त होऊन... पाठीशी उभा राहणारे मित्र या दोघांचे भूमिका... मैत्रीत तेवढीच महत्त्वाचे असते.आज प्रत्येकजण आपआपल्या व्यवसायात व्यस्त असतो,परंतु यानिमित्ताने शाळेतील मित्र भेटल्याचा आनंद वेगळा असतो. सर्व मित्र एकत्रीत येऊन एकमेकांची विचारपुस, चर्चा, गप्पा गोष्टी यामध्ये दिवसभर वेळ कसा गेला कळले सुद्धा नाही. 

दरम्यान  शाळेचे सेवानिवृत शिक्षक  व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी जगदीश इगवे, रमेश मुंडे, नवनाथ पोरे, सायस मुंडे, बालाजी भाकरे, बालाजी अंनलदास,राहुल रोडे, गौतम रोडे, अशोक रोडे, धनाजी कोकणे, धनंजय मेंद्रे, पप्पु थोरात, रवी कोडी, अजय कस्तुरे, नरेंद्र भागवत,संतोष केंद्रे, बालाजी कांदे, भैया गवळी,यशवंत  मुंडे,नागनाथ शेंगुळे,प्रकाश वावदने, आनंद राठोड, डॉ.दिलीप राठोड,अशोक रोडे, ग्यानबा रोडे, विष्णु मुंडे व इतर मिञ उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या