Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत महेश नवमी व वर्धापन दिना निमित्तानं विविध कार्यक्रम



परळीत महेश नवमी, राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑप व राजस्थानी पोदार लर्न स्कुलच्या वर्धापन दिना निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

परळीत महेश नवमी निमित्त राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपच्या 12व्या वर्धापन व राजस्थानी पोदार लर्न स्कुलच्या 8 व्या वर्धापन दिना निमित्ताने विविध आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन

परळी शहरात दि.29 मेसोमवार रोजी महेश नवमीचा उत्सव पहाटे पाच वाजता प्रभू श्री वैद्यनाथास रुद्राभिषेक, पाच क्विंटल अंब्याची आरास...

सायंकाळी 5 वाजता 5100 दिवे लावून दिपोत्सव होणार ...वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री.दत्त मंदिर व श्री राम मंदिर (बालाजी मंदिर) मध्ये महाआरती...

6 फुट उंचीची महादेवाची मुर्ती,7 फुट उंचीचा शिवलिंग व विशालकायी नंदीचा देखावा व दिपमाळा लावण्यात येणार


परळी / प्रतिनिधी

परळी येथे महेश नवमी निमित्त राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसा.लि.परळीच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त व राजस्थानी पोदार लर्न स्कुलच्या 8 व्या वर्धापन दिना निमित्त देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात दि.29 मे रोजी पहाटे पाच वाजता प्रभू श्री वैद्यनाथास रुद्राभिषेक, पाच क्विंटल अंब्याची आरास करण्यात (हाच आंबा भक्तांना प्रसादरुपी म्हणून वाटण्यात येणार) सायंकाळी दिपोत्सव व विविध कार्यक्रमाचे राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसा.लि व राजस्थानी पोदार लर्न स्कुलच्या वतीने परळी तालुका माहेश्वरी सभा अंतर्गत  आयोजन करण्यात आले आहे.


परळी शहरात दि.29मे रोजी महेश नवमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. 

सहकार क्षेत्रात महाराष्ट्रभरात नावाजलेल्या राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसा.लि.मुख्य शाखेचा 12वा वर्धापन दिन व परळी जवळील गंगाखेड रस्त्यावरील राजस्थानी पोदार लर्न स्कुलचा 8 वा वर्धापन दिन महेश नवमीच्या दिवशी साजरा होत आहे. 

या निमित्त परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिरात व मंदिर परिसरातील श्री.दत्त मंदिर व श्री राम मंदिर (बालाजी मंदिर) मध्ये राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसा.लि. राजस्थानी पोदार लर्न स्कुलच्या वतीने परळी तालुका माहेश्वरी सभेच्या अंतर्गत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

महेश नवमीच्या दिवशी दि.29 मे रोजी पहाटे 5 वाजता प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. श्री वैद्यनाथास अंब्याची आरस करण्यात येणार आहे.पाच क्विंटल अंब्याची ही आरास भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे.  व सायंकाळी 5 वाजता दिपोत्सव होणार आहे. यावेळी 5100 दिवे लावण्यात येणार आहेत.

तसेच सायंकाळी 7 वाजता वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री.दत्त मंदिर व श्री राम मंदिर (बालाजी मंदिर) मध्ये महाआरती, 6 फुट उंचीची महादेवाची मुर्ती,7 फुट उंचीचा शिवलिंग व विशालकायी नंदीचा देखावा व दिपमाळा लावण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थानी मल्टिस्टेट चे चेअरमन,राजस्थानी पोदार लर्न स्कुलचे अध्यक्ष,चंदुलाल बियाणी, राजस्थानी पोदार लर्न स्कुलचे सचिव बद्रीनारायण बाहेती, परळी तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष जयपाल लाहोटी, प्रोजेक्ट चेअरमन राकेश चांडक व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या