Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पुन्हा एकलाचखोर अधिकारी बीड लाचलुचपतच्या जाळ्यात

 


■ कांदा चाळीने अधिकाऱ्यांच्या कानाखाली काढला जाळ

पाटोदा / प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पूर्ण झालेल्या कांदा चाळीचे अनुदान मंजूर करण्यासाठी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी यांनी चक्क शेतकऱ्यांला लाच मागितली, तडजोडी अंती ठरलेली लाच रक्कम स्वीकारताना लाचखोर अधिकारी लाच लुचपतचा जाळ्यात अडकला असून ही घटना  घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोकसेवक असलेले पाटोदा कृषी अधिकारी कार्यालय येथे प्रभारी मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कृष्णा महादेव आगलावे (वय 40) यांनी तक्रारदार यांच्या शेतातील पूर्ण झालेली कांदा चाळ यांची पाहणी करून पाहणी अहवाल व देयके ऑनलाईन करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली.तडजोडी अंती एक हजार 500 रुपये देण्याचे तक्रारदार यांनी मान्य करून याबाबत जिल्ह्यातील लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला.

लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून लाचखोर कृषी मंडळ अधिकारी याला दीड हजार रुपयांची रोख रक्कम लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.ही घटना बुधवार दि 31 रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे घडली असून या प्रकरणी लाचखोर अधिकारी याच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी यांनी केली.

बीड जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाच प्रतिबंध विभाग बीड यांचाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या