■ Breaking news | परळीत स्टिंग ऑपरेशन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी या विभागाची उडवली झोप...
■ जिल्हाधिकारी यांची पंचायत समितीला अचानक भेट
■ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती केली साजरी
परळी स्पेशल न्यूज
अनुप कुसुमकर/संतोष बारटक्के
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी अचानक परळी पंचायत समितीला भेट देत पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कार्याच्या आढावा घेतला तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देखील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
धडाकेबाज कारवाई करीत बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात घर केलेल्या जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे ह्या बुधवार दि 31 रोजी परळी शहरात आलेले असताना त्यांनी दुपारी 1 च्या सुमारास अचानक परळी पंचायत समितीला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभाग,पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग यासह इतर विभागातील कार्याचा आढावा घेऊन योग्य असे मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी पंचायत समिती मध्ये निर्माण केलेल्या रोप वाटीकेस भेट देऊन तेथील पाहणी केली.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देखील जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पंचायत समिती येथे साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, गट विकास अधिकारी संजय केंद्रे, एकात्मिक बाल विकास विभाग प्रमुख बी.यु रोडे मॅडम यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Social Plugin