Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी जवळच अनोळखी जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला...

परळी आपला पेपर / प्रतिनिधी 

परळी तालुक्यातील मांडवखेल येथील शिवारात रामनगर तांडा याठिकाणी अनोळखी पुरूष जातीचे प्रेत जळलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.सदर प्रेताचे अंगावर बदामी रंगाचे शर्ट असून त्यावर काळ्या रंगाच्या आडव्या लाईनिंग आहेत. निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट कमरेला बेल्ट पायात बूट उजव्या हातावर Snehad/ असे नाव गोंदलेले आहे.

त्यामुळे या घटनेची माहिती कळताच सपोनि गिते, पो.उप.नि.झांबरेच्या पथकाने तेथे जाऊन घटनास्थळी भेट देऊन सदरील प्रेत हे उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


दि.३० मे २०२३ रोजी १९.०० वा. माहिती मिळाली की मांडेखेल शिवारात रामनगर तांडा च्या जवळ एक पुरुष जातीचे प्रेत अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले आहे. अशी माहिती मिळाली म्हणून सपोनी गीते, पोउपनि झांबरे, पो.ह. केकान,पोना हरगावकर, पोशि अन्नमवार, पोशि येरडलावार, पोशि एकुलवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनाम करुन प्रेत सरकारी दवाखाना परळी वैजनाथ येथे आणून ठेवले असून अपर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम, चोरमले, पोलीस निरीक्षक श्री चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मयताची ओळख पटवण्याची प्रयत्न सुरू आहेत. 

**video newsया तरुणाच्या..'या' कृत्याने संपूर्ण प्रशासन हादरले...*

*https://youtu.be/eiOSFVzOFOo*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या