Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Bjp | मोदींजीचे हात बळकट करण्यासाठी | पंकजाताई मुंडे गुजरात दौऱ्यावर|

 




मोदींचे हात बळकट
करण्यासाठी  पंकजाताई मुंडे गुजरात दौऱ्यावर..

तळागाळातील लोकांची कामे  केल्याने गुजरातमध्ये पुन्हा एकदा  'मोदींची'च...

आपला@पेपर / मुंबई 

Bjpभाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या झंजावती प्रचार दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणकारी योजना थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्याने गुजरातमध्ये पुन्हा 'मोदींची'च सत्ता येणार असल्याचा दृढ विश्वास त्यांनी प्रचार सभांमधून व्यक्त केला.मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन पंकजाताईंनी कालोल,गोधरा येथील सभेत बोलतांना केले.


केंद्रीय स्तरावरील भाजपचे नेते सध्या गुजरात राज्यात प्रचार दौर्‍यावर असून त्याचाच एक भाग म्हणून पंकजाताई मुंडे हया देखील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सकाळीच मुंबई हून विमानाने गुजरातला रवाना झाल्या.सकाळी अहमदाबाद  विमानतळावर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.


कालोल विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार  फत्तेसिंह चौहान तर गोधरा येथील उमेदवार सी. के. राहूल यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांच्या उत्स्फूर्त जाहीर सभा झाल्या. या सभांना मतदारांनी मोठी गर्दी केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे तसेच स्वतः उमेदवार व स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


आपल्या भाषणात पुढे बोलतांना Bjp पंकजाताई म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरात आज विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकांचे राज्य बनले आहे. भारताची व राज्याची संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेपासून ते थेट अंतराळापर्यंत भारताच्या प्रगतीत मोदींच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. 


त्यांनी जनतेसाठी आखलेल्या व अंमलात आणलेल्या कल्याणकारी योजनांचा फायदा तळागाळातील दुर्बल, वंचित घटकांपर्यंत पोचला आहे. गरीबातला गरीब माणूस भाजपला बहुमत देऊन पुन्हा एकदा गुजरातमध्ये त्यांचीच सत्ता आणणार आहे असा मला विश्वास आहे. 


Bjp मोदींचे हात बळकट करणे ही काळाची गरज आहे,त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून विजयी करावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना यावेळी केले. या दौऱ्यात पंकजाताईंनी ठिक ठिकाणी मतदार व कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला.


*परळी रेल्वे स्थानकामध्ये डिझेल इंजिनची धडधड बंद होणार...*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_22.html


*राजे काळ्या मातीच्या कुशीमध्ये विश्रांती घेतात ...तेव्हा !*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_89.html

*एटीएममधून 42 हजार..रु चोरले*

*पैसे काढता येत नसणाऱ्या ग्राहकाचा विश्वासघात..*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/42.html

*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या