Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी रेल्वे स्थानकामध्ये डिझेल इंजिनची धडधड बंद होणार...

 


परळी रेल्वे स्थानकामध्ये
डिझेल इंजिनची धडधड बंद होणार...

 आपला @ पेपर/परळी    

येत्या काही दिवसात डिझेल इंजिनची धडधड बंद होऊन इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्ह या मार्गावर धावू लागतील. परभणी ते परळी हे सुमारे ६४ किलोमीटरचे अंतर असून या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे.मराठवाड्यात रेल्वेची विद्युतीकरण मोठ्या प्रमाणात होत असून याचा फायदा या भागातील प्रवासी नागरिकां बरोबरच औष्णिक वीज केंद्रासाठी लागणाऱ्या कोळशाच्या रॅक,आणि मोठ्या प्रमाणात सिमेंट,स्टील या अवजड सामानाच्या जलद वाहतुकीसाठी मदत होणार आहे.  


परळी रेल्वे स्थानकामध्ये विद्युतीकरणाचे खांब उभारण्यास गती मिळाली असून वेगाने हे काम होत आहे.परळी रेल्वे स्टेशन हे रेल्वेच्या दोन विभागाचे (डिव्हिजन) चे केंद्रबिंदू आहे. सिकंदराबाद डिव्हिजन आणि नांदेड डिव्हिजन.  



सध्या परळी-परभणी, परळी-विकाराबाद मार्गावर रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून या कामाने वेग घेतला आहे. नांदेड विभागाकडून येणारी परभणी - परळी दरम्यान रेल्वे लाईन लगत वीज खांब उभारणे आणि केबल टाकणे जवळपास पूर्णत्वास गेले आहे.


 दरम्यान परळी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक, दोन आणि तीन वर विद्युतीकरणाचे खांब उभे करण्याचे काम मोठ्या गतीने सुरू आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, रेल्वे स्थानकाचा, परिसराचा विकास सातत्याने सुरू असतो.   

परळी रेल्वे स्थानक हे रेल्वेच्या हैदराबाद - औरंगाबाद मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून मराठवाड्यातील मोठी वाहतूक या मार्गावर होत असते. परभणी - औरंगाबाद या मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत.  परभणी ते परळी हे सुमारे ६४ किलोमीटरचे अंतर असून या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम २०२० ला सुरू झाले होते. फेब्रुवारी २०२२ च्या दरम्यान ३१ किलोमीटरचे काम पूर्ण झाले होते. 


पोखरणी ते परळी मार्गावरील खांब उभारणी आणि विद्युत लाईन ओढणीचे काम झाले आहेत. सद्यस्थितीत येथील रेल्वे स्थानकात मोठ्या गतीने विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे.परळीऔ  रेल्वे स्थानकातून परभणी औरंगाबाद किंवा पूर्णाच्या दिशेने तर  सिकंदराबाद  - हैदराबाद, विकाराबाद या मार्गावर प्रवास करता येतो विद्युतीकरणाच्या कामास दोन्ही बाजूने सुरुवात झाल्यामुळे येत्या काही महिन्यात विजेवरील इंजीन परळी स्थानकावरून धावताना दिसू शकते. 


सिकंदराबाद डिव्हिजन मधून विकाराबाद ते परळी यादरम्यान चे विद्युतीकरणाचे काम तीन ते चार टप्प्यात होत आहे. विकाराबाद ते खानापूर पर्यंत विद्युतीकरणाचे काम मागील सहा - सात महिन्यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. या मार्गावरील तिसऱ्या टप्प्यात खानापूर ते परळी या १४५ किलो मिटर अंतरातवर लातूर रोड स्टेशन ते परळी वैजनाथ स्थानकादरम्यान सध्या विद्युतीकरणाचे मोठे खांब उभारण्याचे काम गतीने सुरू आहे.

अपघात | ब्रेकफेल झालेल्या एका भरधाव ट्रकने | तब्बल 30 वाहनांना उडविले|*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/30.html


*एटीएममधून 42 हजार..रु चोरले*

*पैसे काढता येत नसणाऱ्या ग्राहकाचा विश्वासघात..*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/42.html

*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या