Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भरदुपारी घराचे कुलूप तोडून 9 तोळे सोने लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

 


भरदुपारी घराचे कुलूप तोडून 9
तोळे सोने लंपास अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...


आपला@पेपर / आष्टी

कुटुंबासह शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घराचे कुलूप तोडून मंगळवारी दुपारी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 9 तोळे सोन्याचे दागिने व 17 हजारांची रोकड चोरून नेली. 


भाऊसाहेब किसन फुंदे हे आष्टी तालुक्यातील शेकापूर येथील शेतकरी आहेत.मंगळवारी सकाळी ते कुटुंबासह शेतात गेले होते. दुपारी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील धातूच्या पेटीतून 9 तोळे सोन्याचे दागिने व 17 हजारांची रोकड लंपास केली आहे.



याप्रकरणी भाऊसाहेब किसन फुंदे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत.

*राजे काळ्या मातीच्या कुशीमध्ये विश्रांती घेतात ...तेव्हा !*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_89.html

*एटीएममधून 42 हजार..रु चोरले*

*पैसे काढता येत नसणाऱ्या ग्राहकाचा विश्वासघात..*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/42.html

*श्रद्धा,निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_20.html

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या