Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Atm | मधून पैसे काढता येत नसणाऱ्या ग्राहकाचा विश्वासघात करुन 42 हजार रु चोरले |

 


एटीएममधून पैसे काढता येत नसणाऱ्या ग्राहकाचा विश्वासघात करुन 42 हजार..रु चोरले

Atm |माजलगाव येथे एटीएम मधून पैसे काढता येत नसणाऱ्या एका ग्राहकास विश्वासात घेऊन दोनअ ज्ञातांनी पीडित ग्राहकाच्या खात्यातील 42 हजार रुपये चोरले ही घटना दि 7नोव्हेंबर रोजी एसबीआय शाखेच्या एटीएम मध्ये घडली दरम्यान दि19नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


याबाबत प्राथमिक माहितीनुसार  अशी की,शेख माजिद शेख दौला रा.अशोक नगर वय 31वर्ष हा युवक दि7नोव्हेंबर 22 रोजी शहरातील नवीन बस स्टॅन्ड येथील एसबीआय शाखेच्या एटीएम Atm | मधून आपल्या खात्यातील एक हजार रुपये काढण्यासाठी उभा होता.परंतु एटीएम मधून पैसे काढण्याचे ज्ञान नसल्याने त्याला एटीएम मधून पैसे काढता येत नव्हते. तो काही वेळ एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत राहिला.



यावेळी अज्ञात दोघेजण त्याच्या शेजारी येऊन आम्ही तुमचे पैसे काढून देतो म्हणाले. माजेद त्यांनी विश्वासाने आपली एटीएम Atm |त्या अज्ञातांच्या हवाली केले. दरम्यान हात चालाखी करत माजिद याचे खाते मधून बेचाळीस हजार रुपये

अज्ञात दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल



काढून घेतले. हे नंतर माजिद यांच्या लक्षात आले दरम्यान शनिवार दि.19नोव्हेंबर रोजी अज्ञात दोन आरोपी विरोधात माजीद यांच्या फिर्यादी वरून गुर 316/2022 कलम420, 406, 34भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि पालवे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या