Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांसाठी परळीत लवकरच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्टडी रूम साकारणार -सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी

माऊंट लिटरा झी स्कूल वतीने परळी नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व सन्माननीय नगरसेवक यांचा सत्कार समारंभ संपन्न 


आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

परळीत माऊंट लिटरा झी स्कूल वतीने परळी नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा.सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज  दि.12 जानेवारी सोमवार रोजी करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर बोलताना विद्यार्थ्यांसाठी परळीत लवकरच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्टडी रूम साकारणार असल्याची ग्वाही सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळीतील प्रसिद्ध सर्जन माऊंट लिटरा झी स्कूलचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा हे होते.तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉ. रामेश्वर बांगड हे होते. तर समारंभ सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून परळी न.प. चे नगराध्यक्षा मा.सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांचे डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा यांनी शिक्षणासोबतच क्रीडा, आरोग्य आणि राजकारणामध्ये व तरुणांनी उल्लेखनीय कामगिरी करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नवगण महाविद्यालय चे माजी प्राचार्य डॉ. रामेश्वर बांगड सर यांनीही उपस्थिती विद्यार्थ्यांना राजकीय मंचावर योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारी चपळता या विषयावर मार्गदर्शन केले.

सत्कार सोहळ्यात नवनिर्वाचित

परळी न.प  नगरसेविका सौ. वंदना अश्विनकुमार आघाव,दिपक प्रल्हादराव मुंडे,अल्ताफ खान सरदार खान पठाण,सय्यद फारुख गणी, शेख आयेशा मोसीन, नितीन नामदेव रोडे,सौ. मीरा केशव नागरगोजे,सौ.जयश्री शंकर आप्पा मोगरकर, वैजनाथ भानुदास सोळंके,महादेव नागनाथ रोडे,सौ. जयश्री रविंद्र गित्ते, योगेश विजयकुमार मेनकुदळे,सौ. रेश्मा केशव बळवंत, डॉ. पुजा प्रितेश तोतला,सौ. प्रतिक्षा रणजीत देशमुख,सय्यद फरजाना बेगम स. सादेक,

 





















कुरेशी आरेफाबेगम महेबुबपाशा, नितीन माणिक बागवाले,सौ.अंजली केशवराव बनसोडे,शिदे व्यंकटेश बाबुराव,सौ. अश्विनी राहुल केंद्रे ,सचिन रामनाथ सारडा,सौ. अर्चना महेंद्र रोडे, इस्माईल मौला शेख,सुनिल भाऊसाहेब कांबळे, सौ. डावरे सरोजा गौतम,लक्ष्मण जनार्धन मूरकुटे,कुसुमबाई आण्णासाहेब चाटे यांचा सुप्रसिद्ध डॉ. हरिश्चंद्र वंगे दादा यांच्या शुभहस्ते यावेळी सर्व मान्यवरांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कैलास घुगे यांनीही मार्गदर्शन करताना म्हणाले की परळीतील शैक्षणिक चळवळ भविष्यातील योजना व स्पर्धांपरिक्षा माध्यमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे मत व्यक्त केले.




शाळेचे प्राचार्य मंगेश काशीद सर यांनी आभार व्यक्त करून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.कार्यक्रमादरम्यान शाळेने प्रकाशित केलेल्या वार्षिक कॅलेंडरचे सर्व मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अजय गुट्टे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.