Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्रद्धा, निधी नंतर आता कोणाची वाट पहातोय?

 श्रद्धा, निधी नंतर आता  कोणाची वाट पहातोय?

फेसबुक वर टेहळणी करताना सहज वाचण्यात आलेली पोस्ट परंतु अतिशय सत्यवादी आणि परखड मत मांडणारे पोस्ट आवडली म्हणून खास वाचकांसाठी...

परळीत विचारांची खाण तर आहेच  संतांची भूमीही आहे. या भूमीत अनेक विचारवंत आणि राजकीय नेते यांनी अख्खा महाराष्ट्र नाहीतर भारत देशात विचार पोहोचले आहेत....


श्रद्धा वालकर ची घटना पुढे येऊन एक दिवस ही झाला नाही, तोपर्यंत दुसरी घटना पुढे आली. निधी गुप्ता जिला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले गेले याविषयी परळीतील महिला असलेल्या सुचिता यांचे मत अतिशय समर्पक आहे.


आतापर्यंत अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत आणि रोज घडतात. लोक कधी मुलींना तर कधी पालकांना जबाबदार ठरवतात...त्यांनी मुलीला चांगले संस्कार दिले नाहीत अमूक तमूक झाले....


मग काय मुलांना संस्कार देतात का? मुलींवर करा अत्याचार करा.. त्यांचे पस्तीस पस्तीस तुकडे. कधी म्हणायचे हे मोबाईलचे युग आहे. पिढी बदलत चालली आहे. पिढीसोबत कायदा व सुव्यस्था का नाही बदलत?


कशाला पाहिजे आफताबसारख्या आरोपींना पोलीस कोठडी? कधीतरी कठोर निर्णय घ्या करा त्याचेही ३५ तुकडे म्हणजे पुन्हा दुसरा आफताब जन्म घेणार नाही. अत्याचार करण्याच्या आधी का थरकाप होत नाही? कारण, शिक्षा  कठोर नाही. आपण सहज म्हणतो मुलगा सायको असेल; जर तो खरचं सायको असता तर आशा प्रकारे रोज अठरा दिवस शरीराच्या एकएका अवयवाची विल्हेवाट लावली नसती. कदाचित पस्तीस दिवसांनंतर तो तिथे थांबलाही नसता.


या सर्व घटना घडतात त्यात अनेक गोष्टी जबाबदार असतीलही, पण त्यासोबत कायदाही तेवढाच जबाबदार आहे. कायद्याविषयी आरोपीच्या मनात एकादाही भीती का येत नाही? कारण कायदा सुव्यवस्था तीव्र नाही. आरोपीने गुन्हा करण्या अगोदर शंभर वेळेस विचार केला पाहिजे. कशासाठी अशांना पोसता? २४ तासांत द्या शिक्षा... शिक्षासुद्धा एवढी कठोर असली पाहिजे की हजारो आफताब थंड झाले पाहिजेत.


सुचिता पोखरकर

Suchita Pokharkar 

भारतीय जनता पार्टी

 (महिला मोर्चा परळी शहराध्यक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या