Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत कविता रंगते कोजागिरीत कविसंमेलनाने रसिक मंञमुग्ध झाले...

 

फोटो सुनिल फुलारी..

डिझेल पेट्रोलचा भाव मात्र नको तितका भडकला  भाकरीचा..पत्ताच नाही..गॕस माञ फुकट आहे...


परळीत कविता रंगते कोजागिरीत कविसंमेलनाने रसिक मंञमुग्ध झाले...

परळीत आज सायंकाळी 7 वा माधवबाग येथे आयोजित  कविसंमेलनाचा काव्यमैफल या मराठवाडा साहित्य परिषद शाखा अध्यक्ष चंदुलाल बियाणी व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने नियोजनबध्द कविसंमेलनाने  'कविता रंगते कोजागिरीत' यानिमंत्रितांच्या कवितांनी रसिक मंञमुग्ध केले...


बाप म्हणाला दिव्याची वात छोटी कर मला झोप येत नाही 

मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाही वडील म्हणाले आग दिव्याची वात छोटी कर मला झोप येत नाही बिचारी आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करीत राहिली आणि दोघांमध्ये आयुष्यभर वातीसारखी जळत राहिली.. 


दोघांच्या मध्ये आयुष्यभर जळत राहिली.. आता ही अवस्था नाही आता परिस्थिती बदली आहे.


या बदललेल्या परिस्थितीसाठी आता एका वेगळ्या विषयाची एक कविता..


 शेतकरी आमच्यासारखे नावाचे कुणबी नाही शेतकरी असलेले आमचे मंठा जालना जिल्ह्यातून आलेले प्रदीप ईक्कर यांनी आपली कविता  सादर केली...


रानात कापूस वेचणी बोंड फुटला... (प्रदिप) 


राजेसाहेब कदम महाराष्ट्रात ताकतीने लिहू लागले ती पिढी 

स्वतःच्या कवितेची काळजी कोणीही घेतो स्वतःची कविता कोणीही लोकांपर्यंत पोहोचवतो परंतु दुसऱ्याच्या कवितेवर प्रेम करणारा जो कवी असतो तो इतरांच्याच कवितेवर प्रेम करतो अशा पद्धती इतरांची कविता लोकांना पर्यंत पोहोचावी यासाठी माय मराठी सारखी विशेष वाहीनीवर आणखी दहा वर्षानंतर महाराष्ट्रातल्या 40 वर्षाच्या कालखंडातली एकूण एक कवी ज्याच्याकडे लाईव्ह असतील ते राजेसाहेब कदम...


जिथे बायकोच्या लग्नाला वाढदिवसाच्या साडेचारशे कोटी रुपयाचे विमान भेट दिले जाते तो माझा देश आहे की जिथे मुलींना कसं उजवायचं... पोट कस भरायचं... म्हणून आत्महत्या करतात....तो माझा देश म्हणायचा..


अभिमान व आम्हाला सन्मान वाटतो पैसा तुमचा बायको तुमची याचा कुणाला इन्कार नाही कोण कोणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही. 


अरे पण ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात...


 जिथे कित्येक कळ्या उमलण्या आधीच कुस्करला जातात... 


हजारो कळ्या आईच्या गर्भातच ठार केलं जातात मुलींना कसे उजवायचा म्हणून काहींनी .. विहीरी जवळ केल्या... 


तुमच्या महालावर विमान उतरताना आमचे सोडा...विचार करा गरीबांची अशी मजाक उडू नका 


संस्कार आणि संस्कृतीला असे पायदळी तुडवू नका...

(राजेसाहेब कदम

अतून पेटलो पण हळुवार बोलतो मी काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी बेईमान झालेला एकेक नागठेचोतो आम्ही नव्या युगाचा निर्धार बोलतो अन् कवितेला वाहून समर्पित कसे एकरूप होतो आम्ही... 


ज्या गावात अजूनही st पोहोचली नाही त्या गावाने अनुभवली नोटाबंदी आणि जीएसटी त्या गावांनी अनुभवली नोटाबंदी आणि जीएसटी ऑनलाईन व्यवहार लाईन मध्ये चढला..आहे.



अरे प्रचार खोटा कधी म्हणू नये दिल्या घेतल्या प्रेमाला, नोटा कधी म्हणू नये..


विविध रसांची अनुभूती रसिक श्रोत्यांना अनुभवता आली. हास्य , टाळ्या याबरोबरच सामाजिक विषयाच्या अनुषंगाने अंतर्मुखता ही या कविसंमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. या कविसंमेलनात ज्यांच्या कवितेने रसिकमनात कायमचे घर केले असे चित्रपट कलावंत ,हास्यसम्राट , विनोदाचे बादशहा 'नारायण सुमंत (खुंटे पिंपळगाव) यांनी -

      " अरे प्रचार प्रचार , जसा मेवा हातावर

       आधी पुडके आणि गुटखे

         मग कार्यकर्ते फार

         अरे प्रचार प्रचार

          खोटा कधी म्हणू नये

          दिल्या घेतला प्रेमाला

         नोटा कधी म्हणू नये ".

हे विडंबन सादर करून  उपस्थित रसिक श्रोत्यांना खळखळून हसवले. अंगिक अभिनयाच्या साह्याने त्यांनी सादर केलेल्या कवितांनी कविसंमेलनाला रंगत आली. यावेळी त्यांनी -

     ' पिकाची राखण झाली सुरु ' ही लावणीही गेय पातळीवर सादर केली. प्रा.डॉ.प्रतिभा अहिरे यांनी -

   "चांदण्यांत फिरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही

कळ्यांना बहरण्याचे

स्वातंत्र्य उरले नाही"

 प्रत्येक श्वास  बनतो आहे 

जात आणिक धर्म 

निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही"

अशी स्त्रियांच्या वास्तव जगण्याची स्थिती मांडतानाच समाजातील एकंदरीत विसंगतीवर भाष्य करणारी कविता सादर केली. याशिवाय त्यांची -

     "पंख पसरीन म्हणते

      निळ्या नभात मी

      रंग उधळीन या 

      आसमंतात मी " ही कविताही रसिक श्रोत्यांची विशेष दाद मिळवून गेली.

    गेय अभिव्यक्ती व हास्याचे फवारे उडवत रसिक मनावर कायम अधिराज्य करणारे राजा धर्माधिकारी यांनी -


"मंग म्हटलं देवा,तुमी इचार करा असा

का महाराष्ट्राच्या राजकारनात

जाऊन तुमी धसा!

खाते वाटप चालू हाय,फायदा असा होईन 

का मंत्र्याची जागा तुमाले बिलकुल भेटून जाईन!

त...मारोती म्हने मंत्र्याच काम काय असते.?

म्या म्हटलं महाराष्ट्रात मंत्र्याहीले काहीच काम नसते! " ही हनुमंताची नोकरी कविता सादर केली उपस्थितामध्ये हशाच पिकला .कविसंमेलनाला त्यांनी वैदर्भी तडकाच दिला.

     गोड गळ्याचा व सक्षम काव्यविष्कार असलेले सखाराम डाखोरे यांनी त्यांच्या ' गाव ' या कवितेतून

     "गाव मनात घेऊन, इथं आलो मी दुरून

सुख पेरता पेरता, जावं जगणं सरुन "

     असा सुंदर भावाविष्कार केला. त्याचबरोबर नोटाबंदी व जीएसटीवर भाष्य करणारी कविताही आशयपूर्ण होती.

   कवी प्रदीप ईक्कर यांनी -

       "जणू सांडलं रानात, शुभ्र चांदणं दुधाळ

कसी फाटक्या झोळीला, माय जोडते आभाळ" ही जाणीव 'वेचणी ' या कथेतून वास्तवाच्या पातळीवर मांडली. मातीचं महत्त्व विशद करणारी त्यांची कविता विशेष भाव खाऊन गेली.

.उत्कृष्ट निवेदक  अशी महाराष्ट्रभर ख्याती असलेले आपल्या रांगड्या वाणीने रसिक मनावर अमीट छाप उमटवणारे व कवितेच्या प्रांतातही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे  राजेसाहेब कदम  यांनीही यावेळी हुंडा यासारख्या सामाजिक विषयावर संवेदनशील मनाला अंतर्मुख करायला लावणारी कविता सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांची विशेष दाद मिळविली. 

विविध रसांची अनुभूती देता देता वाङ्मयीन गुणांनी परिपूर्ण कविता असलेल्या या निमंत्रितांच्या कविसंमेलनाने परळी पंचक्रोशीतील  रसिकांची कोजागिरी आनंदात संपन्न झाली. 

   कविसंमेलनाच्या उद्‌घाटन सत्राचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून बन्सल क्लासेसचे संचालक प्राचार्य डॉ. बांगड सर व संचालक बद्रिनारायण बाहेती हे उपस्थित होते. उद्‌घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी तर सूत्रसंचालन श्री अनंत मुंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड, कार्याध्यक्ष अनंत मुंडे, उपाध्यक्ष अरुण पवार , कोषाध्यक्ष प्रा.संजय अघाव,  बंडू अघाव  सहसचिव सुनिता कोमावार  ,उपाध्यक्ष चेतना गौरशेटे, प्रसिद्धी प्रमुख बालाजी कांबळे , प्रा. अर्चना चव्हाण ,सिध्देश्वर इंगोले ,दिवाकर जोशी ,  मुक्तविहारी ऊर्फ केशव कुकडे, विजया दहिवाळ, प्रा .डॉ . राजाभाऊ धायगुडे , चंद्रशेखर फुटके ,ॲड. दत्तात्रय आंधळे, रंगनाथ मुंडे  ,  गणपत गणगोपलवाड , प्रा .नयनकुमार विशारद, प्रा.डॉ. रा .ज. चाटे  यांनी विशेष परिश्रम घेतले.


निष्पाप माणसांना रोज घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे होतात राजेशाही...


शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या व्यथा सखाराम डाखोरे. यांनी मांडल्या आहेत...


सविस्तर थोड्यावेळात...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या