Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आज परळीत कविसंमेलन 'कविता रंगते कोजागिरीत 'म.सा.प परळी शाखेचा उपक्रम



आज परळीत निमंत्रितांचे कविसंमेलन 'कविता रंगते कोजागिरीत 'म.सा.प परळी शाखेचा उपक्रम

परळीत मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने कोजागिरीनिमित्त खास अभिरुची संपन्न परळीकर रसिकांसाठी  'कविता रंगते कोजागिरी'त' या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन आज रविवार दि 9 रोजी सायं 7 वा. ' बन्सल क्लासेस माधवबाग येथे आयोजित करण्यात आले आहे.


परळीकर दर कोजागरी पौर्णिमेला या कविसंमेलनाची आतुरतेने वाट पाहात असतात ते म्हणजे कोजागिरी निमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन कविता रंगते कोजागिरी या मनोरंजन प्रिय कार्यक्रमाची म्हणूनच...

 

या कविसंमेलनात चित्रपट कलावंत हास्यसम्राट विनोदाचे बादशहा नारायण सुमंत पिंपळखुंटे - माढा गेय अभिव्यक्ती व हास्याचे फवारे उडवत रसिक मनावर कायम अधिराज्य करणारे राजा धर्माधिकारी परतवाडा श्रृंगार व करूण रसाला पुरक अशी गेय अभिव्यक्तीबरोबरच सक्षम काव्याविष्कार करणारे *सखाराम डाखोरे मुंबई  स्त्री मनाचा सशक्त हुंकार अभिव्यक्ती प्रा.डॉ.प्रतिभा अहिरे औरंगाबाद उत्कृष्ट निवेदक   राजेसाहेब कदम अहमदपूर व ग्रामीण जाणिवांचा सशक्त आविष्कार करणारे प्रदीप ईक्कर मंठा हे कवी निमंत्रित करण्यात आलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या