Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एकनाथ शिंदे यांनी विचाराची आणि पक्ष संघटनेची हत्याच|अभयकुमार ठक्कर

 


एकनाथ शिंदेंच्या
बंडाचा हिशोब येणारा काळ घेईलच-अभयकुमार ठक्कर

परळी येथे शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर मराठी माणसांच्या भल्याचा विचार करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज्यासोबत देशभरात पोहचविण्याचे काम करण्यात आले असून एकनाथ शिंदे यांनी विचाराची आणि पक्ष संघटनेची हत्याच केली आहे. 


येणारा काळ त्यांना या कृतीचा पश्चाताप करायला भाग पाडेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केली.



निवडणूक आयोगाने शिवसेना नावासोबतच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले असून शिवसेनेचा विचार व प्रभाव इतिहास जमा करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेल्या फुटीमुळे घडला आहे. 


ज्या पक्षात आपण लहानाचे मोठे झालो,ज्या पक्षाने आपल्याला पद आणि प्रतिष्ठा दिली त्या पक्षाला मुठमाती देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप अभयकुमार ठक्कर यांनी केला आहे. वास्तविक पाहता शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारी संघटना असून राज्यभरात रक्त वाहिन्यांसारखे शिवसेनेचे जाळे पसरले आहे. 


तुम्ही मनातून शिवसेनेतून बाहेर पडला असलात तरी लाखो नागरिक आणि शिवसैनिकांच्या मनात अजूनही शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव कायमच राहील असे सांगत तुमच्या कृतीचा हिशोब येणारा काळ करेल तेंव्हा तुम्ही सैरभैर झाला असेल असा टोलाही अभयकुमार ठक्कर यांनी लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या