Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हरsहर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय...चा जयघोष करत... लाखो भाविकांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन


परळी //दुसऱ्या श्रावण सोमवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी परळी येथील वैद्यनाथ मंदिर येथे  हर हर महादेव, वैद्यनाथ महाराज की जय...चा जयघोष करत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गर्दीत गर्जनाने शिवभक्तांनि घेतले दर्शन .

आज श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे काकडा आरती, अभिषेक पूजा होवून दर्शनाला सुरूवात झाली. दर्शनासाठी स्त्री, पुरूष भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगा होत्या. दर्शन व्यवस्था  भाविकांची गरज लक्षात घेत   देवस्थान संस्थेचे सचिव मा.श्री. राजेश देशमुख ,त्यांचे सहकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

अनेक ठिकाणी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेल, फुल, प्रसादाची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. परळी परिसरातील गोदावरी नदी काठावरील अनेक भाविक कावडीत गंगेच्या पाणी घेऊन येतात त्याव्दारे   'श्रीमहदेवाच्या पिंडला जल अभिषेक करतात .अनेक भाविक पायी चालत येवून श्रावणात  गंगेच्या पाण्याने अभिषेक करून पूजा करतात. त्यास 'वैद्यनाथाची कावड' असे म्हणतात.  अनेक भाविकांनी श्रावण सोमवारनिमित्ताने दर्शन घेतले, पूजाअर्चा केली.