Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

हिंगोली शहरात कावडयात्रेवर काही व्यक्तींनीची दगडफेक ;दुपारनंतर परिस्थिती तणावमुक्त...जनजीवन सुरुळीत..



हिंगोली// शहरात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कावडयात्रेवर काही व्यक्तींनी दगडफेक केली. त्यानंतर हिंगोली शहरात मोठा वाद निर्माण झाला असून हिंगोली शहरातील औंढा नागनाथ रस्त्यावरील ईदगाह मैदान, अग्रसेन चौक, देवडा नगर, हरण चौक आदी भागात दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत १० ते १५ जण जखमी झाले असून तोडफोडीत ४ बसगाड्या, ऑटो, मोटारसायकली, स्कूटर अशा २० ते २५ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार आणि दोन्ही गटांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कावड यात्रेची मिरवणूक काढण्यासाठी डिजे वाजवत काही तरुण देवडा नगर भागातून जात होते. तर मुस्लिम तरुणांचां एक जत्था इदगाह मैदानाकडे जात होता. दोघांचे गट समोरासमोर येताच दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर तुटून पडले. यामध्ये एका मुलाला गंभीर मारहाण झाली असून त्याला नांदेड येथील रुग्णालयात पाठवले.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उपअधीक्षक सुधाकर रेड्डी, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हिंगोली चे खासदार यांनीसुद्धा हिंगोली शहरात ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खासदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की या घटनेमध्ये ८ ते ९ शिवसैनिक सुद्धा जखमी झाले असून पोलिसांवरही हल्ला झाला आहे.

दुपारनंतर परिस्थिती सामान्य
हिंगोली शहरातील झालेल्या वादानंतर दुपारी १२.३० नंतर परिस्थिती सामान्य झाली असून परिवहन आगाराच्या वतीने बसगाड्या सुद्धा सोडण्यात आल्या. त्याचबरोबर शहरातील दुकानदारांनी सुद्धा दुकाने उघडली.