Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत अखंड हरिनाम सप्ताहा ; संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाने साजरा होणार समाधी सोहळा..!

    
   

परळी // श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवषीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताहा 24 जुलै ते 31 जुलै पर्यंत चालणार आहे.
श्री संत नामदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त नामदेव महाराज मंदिर, कृष्णानगर येथे 24 जुलैपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरूवात झाली आहे. याअंतर्गत दररोज पहाटे 4 वा. काकडा, 6 ज्ञानेश्वरी पारायण. 10 वा. गाथा भजन, दुपारी 2 वा.ते 4 भावर्थ रामायण, सायंकाळी 7 वा. धुपारती, रात्रौ 8ते 10 हरिकिर्तन व 12 वा जागर कार्यक्रम होणार आहे.तसेच दररोज सुप्रसिद्ध भजनी मंडळाचे दुपारी 4 ते 6 वा भजन सादर केले जातील .अंखड हरिराम सप्ताहात दि. 25 जुलै गुरुवार    रोजी ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के ,दि26 जुलै शुक्रवार रोजी ह.भ.प.मधुसुदन महाराज सातपुते,दि.27 जुलै शनिवार रोजी ह.भ.प. संजीवनीताई परळीकर दि.28 जुलै  रविवार ह.भ.प. ॲड दत्ताञय महाराज आंधळे , दि 29 जुलै सोमवार  ह.भ.प. विनोदाचार्य भरत महाराज जोगी ,दि 30 जुलै मंगळवार रोजी ह.भ.प.संपत महाराज गित्ते गुरुजी, सकाळी 10 ते 12 पुजेचे किर्तन नंतर दिंडी प्रदक्षिणा  व महाप्रसाद रात्री 8 वा ह.भ.प. उत्तम  महाराज होंळबे यांचे किर्तन होईल .  दि. 31जुलै बुधवार रोजी  ह.भ.प. भागताचार्य भरत महाराज सोडगीर यांचे काल्याचे किर्तन होईल.  या सर्व कार्यक्रमात श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे नेतृत्व ह.भ.प नारायण महाराज बारटक्के  हे करीत असून. सदरील कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज  यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे स्थळ संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर कृष्णा नगर परळी वैजनाथ हे राहील .
वरील सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज श्री संत नामदेव महाराज महिला मंडळ  श्री संत नामदेव महाराज युवक मंडळ, कृष्णनगर युवक मंडळ,किर्तीनगर  मिञमंडळ, तुळजाईनगर मिञमंडळ यांनी केले आहे .