Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

वायरल video ! शाळा महाविद्यालये परिसरात सामाजिक जागृती झाली तर गुन्हेगारीचे प्रमाण घटू शकेल!




गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होणार नाही यासाठी बालपणापासून अत्यावश्यक असलेले संस्कार पालकांकडून आज होत नाहीत. संस्कारांचा अभाव शालेय शिक्षण काळात शिक्षकवर्ग पिढी घटवण्यात कमी पडतो, तर महाविद्यालयीन मुक्त जीवन काळात विद्यार्थ्यांवर कोणी लगाम घालू शकत नाही शिक्षण संपादन करीत असताना मानसिक दुर्बलता दूर होत नसल्यामुळे हे घडते. विद्यार्थी दशेत असताना त्यांची योग्य जडण-घडण करण्याची उत्तम कामगिरी पालक व शिक्षकच करू शकतात. पण आजच्या घाईगर्दीच्या दैनंदिन जीवनक्रमांत पालकांना आपल्या मुलांची सर्व ती जबाबदारी पेलण्यासाठी वेळ नि फुरसत नसते. तथापि त्यांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढायलाच हवा. तरच आपल्या मुलांचे जीवन ते यशस्वी नि सुसह्य बनवू शकतील.

अशी एकूण सामाजिक परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी प्रयत्न करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गुन्हेगारी वाढू नये म्हणून शासन व पोलीस यंत्रणा सक्षम हवी. तसेच गुन्हेगारीची बिजे पेरली जाणार नाही म्हणून प्रभावी संस्कार करणारे पालक, शिक्षक, सामाजिक अन्य घटक कार्यक्षम असणे हे त्याहूनही अधिक गरजेचे आहे. याची जाणीव होऊन सामाजिक जागृती झाली तर गुन्हेगारीचे प्रमाण घटू शकेल!